घराणेशाहीचा आरोप कोणी करणार नाही असं काम करून दाखवीन: आ. रोहित पवार

संगमनेर: महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं.
LIVE
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था आयोजित मेधा फेस्टिवल@AUThackeray @MeDeshmukh@RRPSpeaks @ruturajdyp @zeeshan_iyc @iAditiTatkare या तरूण आमदारांची संगीतकार गायक @AvadhootGupte यांनी घेतलेली मुलाखत https://t.co/SYyafDEP1I— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 17, 2020
रोहित पवार म्हणाले की, कर्जत- जामखेड मधील जनता माझ्या पाठिशी असल्यामुळे माझा विजय झाला. तसेच तुम्ही ज्या वेळी निवडून आलात तेव्हा तुमच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असल्याचा भावनिक प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला होता. यावर मी जिंकलो म्हणून माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले नव्हते. तर लोकांनी मला मोठ्या प्रेमाने, मताधिक्याने निवडून दिले त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी आम्हाला कधीही हार मानायची नाही. कितीही मोठं आव्हान समोर असलं तरी झुकायचं नाही हे शिकवलं असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
राजकारणात किती लोकांना वाटलं पवार साहेब रिटायर होतील. पण ते म्हणाले, नाही, हार मानायची नाही आणि कितीही संकटं आली तरी झुकायचं नाही, प्रामाणिक वागा, लोकांमध्ये जा, मग तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही, हे पवार साहेबांकडे पाहून आम्हाला कळतं, असं रोहित पवारांनी सांगितलं.
‘कर्जत-जामखेडमध्ये गेली ३० वर्षे विकास झाला नव्हता म्हणून त्या मतदारसंघातून लढलो. आता इथं विकासाचं असं मॉडेल निर्माण करेन की भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही,’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी आज बोलून दाखवला.
Web Title: Karjat Jamkhed will become role Model of Development says NCP MLA Rohit Pawar.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं