आज मोदींची नांदेडमध्ये तर राज ठाकरेंची मुंबईत सभा

मुंबई : आज गुढीपाडव्याचा मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर तोफ धडाडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे प्रत्यक्ष निवडणुकीत न उतरता आघाडीला मदत करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभूत करण्यासाठी रणशिंग फुंकणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील नांदेडमध्ये सभा असून भाजप देखील कामाला लागली आहे.
काही दिवसांपूर्वी वर्ध्यात मोदींची सभा झाली होती, परंतु त्याला लोकांनी प्रतिसाद न दिल्याने विरोधकांना चांगलेच कारण मिळाले होते. तर १९ मार्च रोजी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना देखील लक्ष्य केलं होतं. त्यामुळे आजच्या सभेला दोन्ही बाजूने एकमेकांवर काय तोंडसुख घेतलं जाणार ते पाहावं लागणार आहे.
मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसली तरी भाजपाविरोधात प्रचार करण्याचं जाहीर आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्याने ते देखील निर्धास्त आहेत. मनसेने मोदी-अमित शाह या जोडीविरुद्ध दोन हात केल्याने आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमका काय निशाणा साधणार यावर सगळ्यांचेच लक्ष राहिल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं