प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला पुणेकरांचा अल्पप्रतिसाद

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वपक्षीय नेत्यांचा सभांचा धडाका सुरु असून वंचित बहुजन आघाडीचा देखील प्रचार जोमात सुरु आहे. परंतु, पुण्यात शनिवारी सकाळी प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला लोकच जमली नाहीत. यासभेला फारशी गर्दी झाली नव्हती. मैदानातील खुर्च्या मोठ्या प्रमाणावर रिकाम्याच होत्या. संध्याकाळी याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी सभा होणार असून या सभेला तरी पुणेकर येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात ४ टप्प्यांपैकी २ टप्प्यांमधील मतदान झाले आहे. शेवटच्या २ टप्प्यातील मतदानासाठी सध्या राजकीय पक्षांनीही कंबर कसली असून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, एनसीपी आणि वंचित बहुजन आघाडीची नेते प्रचारसभा घेत आहेत. शनिवारी पुण्यातील वडगाव धायरी येथे बारामती लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.
तत्पूर्वी वंचित आघाडीच्या सभांना राज्यातील अनेक भागात चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु, पुण्यात वंचित आघाडीच्या सभेबाबत लोकांना निरुत्साह दिसून आला. सभेला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता वंचित आघाडीच्या उमेदवाराचे काय होणार, याबाबत चर्चा रंगली होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं