अजब! ५५% लोकांना युतीची सत्ता नको; पण ओपिनियन पोलमध्ये भाजप-सेनेची सत्ता येण्याचे संकेत?

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून, २१ तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र मागील काही वर्षांपासून मतदाराला प्रभावित करण्यासाठी हे प्रयोग खुलेआम पणे सुरु आहेत. ८-१० कोटी मतदारांच्या मनात आहे हे १९-२० हजार मतदारांना विचारून अंदाज व्यक्त केला जातो आहे. विशेष म्हणजे हे सॅम्पल्स नेमके कोणत्या विभागात आणि कोणत्या अमुक ठिकाणी घेतले गेले याचा कोणताही उल्लेख नाही.
धक्कादायक म्हणजे त्यातील काही प्रश्नामध्येच मोठं गुपित उघड होताना दिसत आहे. त्यातील एक उदाहरण सांगायचे झाल्यास, एका खाजगी वृत्त वाहिनेने आणि त्याच्या सहकारी संस्थेने मतदाराला प्रश्न विचारला ते खालील प्रमाणे, ज्यामधून हे गौडबंगाल नेमकं काय असे प्रश्न समाज माध्यमं उपस्थित करत आहेत;
१) राज्यातलं सरकार तुम्ही तातडीने बदलू इच्छिता का?….या प्रश्नावर ५५ टक्के लोकांनी उत्तर दिलं “होय”
२) तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री तातडीने बदलू इच्छिता?…..या प्रश्नावर ५४.५ टक्के लोकांनी “होय” असं उत्तर दिलं.
३) तुम्हाला तुमचा आमदार तातडीने बदलायचा आहे काय? या प्रश्नावर ५४.७ टक्के लोकांनी उत्तर दिलं “होय”
वरील प्रश्न आणि उत्तरावरून प्रत्यक्षरित्या खालील अंदाज स्पष्ट होतो तो असा;
१) ५५ टक्के लोकांना भाजप-शिवसेना (युती) सरकार पुन्हा नको असून ते हे सरकार तातडीने बदलू इच्छितात.
२) ५४.५ टक्के लोकांना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने बदलू इच्छितात.
३) ५४.७ टक्के लोकं त्यांचा विद्यमान आमदार तातडीने बदलू इच्छितात आणि पुन्हा त्यांना तोच आमदार नको आहे.
सामान्य लोकांच्या वरील उत्तरांनुसार स्पष्ट होणारे खालील मुद्दे असे असायला हवेत.
१) ५५ टक्के लोकांना जर भाजप-शिवसेना (युती) सरकार पुन्हा नको असेल तर राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना सरकार स्थापन होणार हा अंदाज कोणत्या आधारावर करण्यात आला आहे?
२) ५४.५ टक्के लोकांना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने बदलू इच्छितात. मग मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना ३७.७ टक्के लोकांची पसंती सांगण्यात आलं आहे. जर ५४.५ टक्के लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नकोसे आहेत हे यांचा ओपिनियन पोल सांगतो मग ३७.७ टक्के लोकांची पसंती पुन्हा त्यांनाच याचा ताळमेळ लागताना दिसत नाही.
३) ५५ टक्के लोकांना भाजप-शिवसेना (युती) सरकार पुन्हा नको, तसेच ५४.५ टक्के लोकांना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने बदलू इच्छितात आणि ५४.७ टक्के लोकं त्यांचा विद्यमान आमदार तातडीने बदलू इच्छितात, मग भाजपाला १३४ जागा आणि शिवसेनेला ६० जागा कोणत्या आधारावर दाखविण्यात आल्या आहेत तो संशोधनाचा विषय आहे.
सध्या भाजपाकडे १२२ आमदार आणि शिवसेनेकडे ६३ आमदार आहेत. संबंधित वृत्तवाहिनेने वर्तविलेल्या आकडेवारीनुसार जर बोलायचे झाल्यास, भाजपच्या १२२ जागांमधील वरील ओपिनियन पोलनुसार ५४.७ लोकं पुन्हा तोच निवडून देण्यास तयार नाहीत असं ग्राह्य धरल्यास भाजपचे निकालाअंती केवळ ५७-५८ आमदार निवडून येणार असं सिद्ध होतं. मग मूळ सर्व्हेत भाजपाला १३४ जागा जिंकण्याचा नेमका आधार कोणता असावा आणि नेमका यांचा हेतू काय आहे ते स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तसेच विद्यमान १२२ आमदारांव्यतिरिक्त अनेकांना उमेदवारी मिळणार की नाही हेच शेवटपर्यंत माहित नव्हतं, मग १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान नेमके कोणत्या आमदाराला अनुसरून प्रश्न विचारले गेले असावेत हा देखील प्रश्न अधांतरीच आहे.
त्यानंतर शिवसेनेकडे सध्या ६३ आमदार आहेत आणि त्यातील एखादा अपवाद वगळल्यास जवळपास सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मग ५४.७ लोकांना पुन्हा तोच आमदार नको आणि शिवसेना मागील निवडणुकीपेक्षा देखील कमी जागा वाट्याला आल्या असतील तर शिवसेनेच्या आमदारांचा आकडा थेट ३० आमदारांवर येऊन पडेल (५४.७ टक्के लोकांचा कल) असं सध्याचं चित्र सांगतं.
विशेष म्हणजे याच वृत्तवाहिनीने ज्या संस्थेच्या माध्यमातून हा ओपिनियन पोल प्रसिद्ध केला आहे त्यातील एकूण ५ प्रश्नांचा विचार केल्यास, प्रश्न क्रमांक १ आणि २ यांच्या आकडेवारीचा प्रश्न क्रमांक ३-४-५ मधील आकडेवारीशी कोणताही ताळमेळ बसत नाही.
त्यात ही विधानसभेची निवडणूक असताना देखील लोकांनां एक हास्यापद प्रश्न विचारण्यात आला आहे. तो प्रश्न आहे “पंतप्रधान पदासाठी तुमची पसंती कोणाला”. मुळात लोकसभा निवडणूक ५ महिन्यांपूर्वी होऊन गेली असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदी विराजमान झाले आहेत. पुढील लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये होणार असून, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मोदी ब्रँड घुसवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आल्याचं मार्केटिंग तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
तसेच “इतर” म्हणजे नेमके कोणते पक्ष याचा कोणताही उल्लेख करण्यात आला असून संभ्रम कायम ठेवण्यासाठीच केलं असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. तसेच मुख्यमंत्री पदासाठी तुमची पसंती कोणाला असेल या प्रश्नावर ६ टक्के लोकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पसंती दिली आहे तर ५.१ टक्के लोकांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली आहे. मात्र एकूण जागांमध्ये मनसेला १ जागा तर शिवसेनेला ६० जागा दाखविण्यात आल्या आहेत हे विशेष म्हणावे लागेल.
पोलच्या अंती संबंधित संस्थेने ही जनमत चाचणी राज्यातील सर्व सामाजिक-आर्थिक स्थरावरील वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांशी चर्चा करून काढले आहेत असं म्हटलं आहे. आता मत व्यक्त करताना या संस्थेने संबंधित व्यक्तीचा आर्थिकस्तर कसा जाणून घेतला ते कळण्यास जागा नाही. तसेच मार्जिन ऑफ एरर नोट टाकून एखाद्या म्युच्युअल फंडाच्या जाहिरातीप्रमाणे “कॉशन” ओळ टाकून पळवाट शिल्लक ठेवल्याचं देखील दिसत आहे.
दरम्यान, याच सर्व्हेच्या समाज माध्यमांवरील प्रतिक्रिया पाहिल्यास वास्तव समोर येईल की लोकांच्या पोटात आणि मनात नेमकं काय आहे ते. कारण ९९.९९ टक्के प्रतिक्रिया या भाजप आणि शिवसेना विरोधातील आहेत आणि विशेष म्हणजे भाजप समर्थक देखील त्यात समर्थन करताना दिसत नाहीत. त्यामुळे मतदानाच्या २ दिवस आधी हा अट्टाहास नेमका कोणत्या उद्देशाने आणि मतपरिवर्तन करण्याचा खटाटोप असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. एकूणच कालच्या सर्व ओपिनियन पोलचा अर्थ असाच होतो की, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, मंदी आणि इतर अनेक गंभीर विषयांवरून राज्यात मतदार अत्यंत खुश असून पुढील ५ वर्ष महागाई अजून वाढावी, बेरोजगारीचा भस्मासूर उभा राहावा, शेतकरी आत्महत्या व्हाव्या आणि मंदीने लोकांचं अजून दिवाळं काढावं यासाठी मतदार विद्यमान सत्ताधाऱ्यांना भरभरून मतदान करण्यास सज्ज झाला आहे असंच म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं