भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-एनसीपी सेनेला पाठिंबा देऊ शकतात: पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार मतदाराने भाजप-शिवसेना युतीला कारभारासाठी आणखी ५ वर्षे दिली आहेत. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची एकत्र येण्याची शक्यता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा जागांपैकी भाजपाने १०५ जागा जिंकल्या आहेत. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या आहेत. अशा प्रकारे भाजप-शिवसेना युतीला एकूण १६१ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसने ५४ तर कॉंग्रेसने ४३ जागा जिंकल्या आहेत.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १२२ जागा, शिवसेनेला ६३, कॉंग्रेसला ४२ आणि राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. २०१४मधील विधानसभा निवडणुक भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. मात्र, निकालांनंतर शिवसेना भाजपप्रणीत सरकारमध्ये सामील झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, निकालांनंतर महाराष्ट्रातही पुढील सरकार स्थापन करण्याची एक’रंजक बातमी समोर येऊ शकते. परंतु कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर युती करणार की नाही याबद्दल अजून भूमिका स्पष्ट केली नाही.
२०१४च्या तुलनेत शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निवडणुकीत सर्वाधिक वाढ नोंदविली आहे, तर भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तथापि, यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उत्साह कमी झाला नाही आणि त्यामुळे या शक्यता प्रत्यक्षात खऱ्या न झाल्यास पुढील ५ वर्षे भाजपा-शिवसेना युती पुन्हा राज्य करेल, असे देखील चव्हाण म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं