शिक्षणमंत्र्यांचं गणित बघा; ७००० गुणिले १२ बरोबर ७२ हजार?

पालघर : महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे पुन्हा एकदा सामान्यांच्या टीकेचे लक्ष झाले आहेत. ययाधी ते त्यांच्या पदवीवरून तर कधी त्यांच्या शिवराळ भाषेवरून नेहमीच वादात अडकले आहेत. आज पुन्हा पालघरमध्ये काँग्रेसच्या न्याय योजनेचा गुणाकार उपस्थितांन समोर करत असताना स्वतःच गणित देखील कच्च असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यावरून उपस्थितांमध्ये तावडेंच्या शिक्षणावरून पुन्हा कुजबुज सुरु झाली होती.
पालघरमध्ये भारतीय जनता पक्षकाडून उमेदवारीसाठी शिवसेनेत गेलेले युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आज पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या न्याय योजनेवर टीका केली. मात्र, काँग्रेसची योजना मांडताना आणि त्यातील गणित लोकांना समजावताना त्यांचं स्वतःचा गुणाकारच चुकला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा झाली.
राहुल गांधी यांनी गरिबांच्या खात्यात महिन्याला ७,००० रुपये जमा करण्याची घोषणा केल्याने वर्षाला प्रत्येकाच्या खात्यात ७२,००० जमा होणार आहेत.’, असे विधान राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी केले आणि उपस्थित लोकं देखील हसू लागली. या वक्तव्यामुळे शिक्षण मंत्र्यांचा गुणाकारच कच्चा असल्याची चर्चा पालघरमध्ये रंगली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं