सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे 2 लाख मतांनी पराभूत होणार: पृथ्वीराज चव्हाण

कराड: विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडणार आहे. भाजपाकडून निवडणूक लढविणारे छत्रपती उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत 2 लाख मतांनी पराभूत होणार असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मोदी-शहा कोणीही आले तरी उदयनराजेंचा पराभव निश्चित आहे असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला आहे.
पुढे बोलताना अमित शहा यांना लक्ष केले म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, असे म्हणत शाब्दिक निशाणा साधला. कराडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडात येणार होते पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठविला असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी अमित शहांना लगावला आहे. कराड दक्षिण या मतदारसंघातून भाजपाकडून अतुल भोसले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवित आहेत.
दरम्यान, कलम ३७० बाबत बोलताना चव्हाण म्हणाले, ‘महाराष्ट्रात येऊन इथल्या प्रश्नावर न बोलता कलम ३७० वर बोलणाऱ्या अमित शाहांनी काश्मीरबाबत अभ्यास करावा, असा सल्ला चव्हाण यांनी दिला. मी लोकसभेचा उमेदवार असतो तरीही आणि आता श्रीनिवास पाटील आहेत तरीही ते दोन लाख मतांनी जिंकणार आहेत. उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा चव्हाणांनी केला. पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून मी लोकसभा लढलो नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं