शिंदे गटाला धक्का, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा शिवसेनेत प्रवेश, राज्यात बंजारा समाजाचा 2 कोटी मतदार

Shivsena Uddhav Thackeray | पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी जात त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. या समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदेगटाचे आमदार आणि मंत्री संजय राठोड हे बंजारा समाजातून येतात. या समाजाचा राठोड यांना पाठिंबा आहे. पण आता पोहरादेवीच्या महंतांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान :
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवीचे सुनील महाराज महंत आहेत. मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळावे यासाठी महंत सुनील महाराज यांनी प्रयत्न केले होते. संजय राठोड यांना एका युवतीच्या आत्महत्येप्रकरणात मंत्रिपद सोडावे लागले होते. राठोड यांच्या पाठिशी बंजारा समाजाला उभे करण्यासाठी सुनील महाराज यांनी पुढाकार घेतला होता.
यावेळी बोलताना महंत सुनील महाराज यांनी म्हटले की, नवरात्रोत्सवात मोठा निर्णय घेणार असल्याचे याआधीच जाहीर केले होते. त्यानंतर आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. पोहरादेवी येथे येण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमंत्रण देण्यात आले आहे. निवडणूक लढवण्याबाबत उद्धव ठाकरे आणि बंजारा समाज निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र दौरा करणार :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ असे म्हटले जाते. दसराजवळ आला असताना महंत शिवसेनेत आले आहेत. ज्यांना आम्ही न्याय दिला. त्यांनी पाठित खंजीर खुपसला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दसऱ्यानंतर मी महाराष्ट्र दौरा करणार आहे. त्यादरम्यान पोहरादेवीलादेखील जाणार असल्याचे उद्धव ठाकरे सांगितले. लढताना जे सोबत येतात त्यांचे जास्त महत्व असते, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Maharashtra politics Banjara Samaj Mahant Sunil Kumar join Shivsena in presence of Uddhav Thackeray 30 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं