आधी विहिरी गायब आता 'ती' करोडो झाडं गायब? केंद्राच्या समृद्ध जंगलाच्या यादीत राज्याचं नाव नाही

मुंबई : भारत सरकारच्या केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागामार्फत समृद्ध जंगल असणाऱ्या टॉप ८ राज्यांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार या यादीत सिक्कीम, मिझोराम सारख्या छोट्या राज्यांनी अव्वल क्रमांक प्राप्त झाला आहे. परंतु, या यादीत महाराष्ट्राला कोणतेही स्थान मिळालेले नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने फेसबुकच्या माध्यमातून केला आहे.
दरम्यान, मागील ५ वर्षांपासून फडणवीस सरकारने ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशा घोषणा देत हजारो कोट्यवधी वृक्ष लागवडीसाठी खर्च केले. मग, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राला स्थान का नाही? असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे. मग फडणवीस सरकारने लावलेली करोडो झाडं गेली तरी कुठे? असा सवाल सध्या उपस्थित केला जातो आहे.
सर्रास जंगलतोड होतेय. प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. दरवर्षी कोटींच्या संख्येने वृक्षलागवड करूनही महाराष्ट्राची जंगले समृद्ध झाली नसतील तर वृक्ष लागवडीच्या जनजागृतीसाठी निघालेल्या मंत्र्यांनी हजारो कोटी फस्त करून जनतेची फसवणूक केली असंच म्हणावं लागेल असं देखील राष्ट्रवादीने म्हटलं आहे. दरम्यान मागील वर्षात अनेकवेळा दिवसाला करोडो झाड लावल्याचा दावा वारंवार फडणवीस सरकारने जाहिरातबाजी करत केला आहे. मात्र सरकारने खोदलेल्या लाखो विहिरींप्रमाणे, सध्या करोडो झाडं देखील गेली कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्रातली जंगलं समृद्ध नाहीत.
समृद्ध जंगलांच्या टॉप ८ महाराष्ट्राला स्थान नाही. केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागाने ही यादी प्रसिद्ध केली आहे. देवादिकांच्या संख्येएवढी झाडं लावूनही राज्य उजाडच! #jungle में मोर नाचा किसीने ना देखा? @SMungantiwar pic.twitter.com/baBietvEwx— NCP (@NCPspeaks) July 12, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं