Breaking | कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार | राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, ०५ जुलै | राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ग्रामीण भागात कोविड मुक्त गावातील ग्रामपंचायतीनं त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरु करणेबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा. शाळा सुरु करताना मुलांना टप्प्या टप्प्यात शाळेत बोलवण्यात यावं. म्हणजेच अदला बदलीच्या दिवशी, सकाळी आणि दुपारी महत्वाच्या विषयांना प्राधान्य देत शासनानं दिलेल्या कार्यपद्धतीचं पालन करण्यात यावं, असं शालेय शिक्षण विभागानं सांगितलं आहे.
शासनानं जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं. एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, लगेच कोरोना चाचणी करुन घेणे या नियमांचं पालन करण्यात यावं, असं शासनानं शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Maharashtra state Education department issue GR for starting standard of 8 to 12 in Covid free area news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं