Maharashtra Unlock | मुंबईत आजपासून रात्री १० पर्यंत दुकाने खुली राहणार | तर पुण्यातील नियमांवरून महापौरांची नाराजी

मुंबई, ०३ ऑगस्ट | मुंबईमध्ये कोरोना रुग्ण कमी होताना दिसत आहेत, त्यानुसार मुंबईमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंधांबाबत राज्यासाठी सुधारित आदेश जारी करताना सरकारने मुंबईचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सोपवला होता. त्यानुसार आपल्या अधिकारात मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पालिका क्षेत्रासाठी आदेश जारी करत निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथीलता दिली आहे. नवे आदेश आजपासून(३ ऑगस्ट) लागू केले जाणार आहेत.
काय आहेत नवे नियम? मुंबईत आता शिथिलतेसाठी सुरुवात झालेली आहे. नवी नियम खालील प्रमाणे आहेत
* सर्व दुकाने आणि आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. त्याचवेळी मेडिकल आणि केमिस्ट दुकाने आठवड्यातील सर्व दिवस २४ तास उघडी ठेवता येतील
* सर्व रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आठवड्याचे सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल
* जलतरण तलाव आणि निकट संपर्क येऊ शकतो असे प्रकार वगळून अन्य इनडोअर आणि आऊटडोअर खेळांना आठवड्याचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी असेल
* चित्रीकरण नियमित वेळेनुसार करण्यास परवानगी असेल
दरम्यान, राज्य सरकारने कोरोनामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीतून राज्यातील 25 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु, पुणे जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याला तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना मात्र राज्य सरकारचा हा निर्णय पटला नसून मुंबईत एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Maharashtra Unlock process start with news guidelines news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं