शिवसेना तब्बल ८-१० विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार; कोअर कमिटीकडून नावं निश्चित

मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होऊ शकते. मात्र शिवसेनेतील गोटातून अनेक विद्यमान आमदारांना नारळ दिला जाऊ शकतो असं वृत्त आहे. यामध्ये पक्षाने स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. तसेच इतर पक्षातील आयात दिग्ग्जची आर्थिक ताकदीवर वर्णी लागण्याची शक्यता असल्याने आमदार धास्तावले आहेत.
त्यात युती झाल्यास अनेक ठिकाणी जागा भारतीय जनता पक्षासाठी सोडल्या जाण्याच्या शक्यतेने विद्यमान आमदार धास्तावले आहेत. त्यामुळे शिवसेनेत आयत्यावेळी मोठी बंडखोरी होऊ शकते असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे. दरम्यान, तिकीट कापण्यात येणाऱ्या आमदारांची नावे कोअर कमिटीकडून निश्चित झाली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक आमदारांची धावपळ सुरु झाली आहे.
मागील ५ वर्षांचा कार्यकाळ विचारात घेता सर्वच आमदारांच्या कामगिरीचा आढावा पक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार अनेक आयात उमेदवारांना आणि पक्षाच्या विद्यमान जिल्हाध्यक्षांना संधी दिली जाऊ शकते. मात्र इतरत्र देखील संधी नसल्याने अनेकपण धास्तावले आहेत. असं असलं तरी पक्ष उमेदवारी जाहीर करण्यास उशीर करेल, अन्यथा नाराज थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गळाला लागू शकतात याची पक्षाला कल्पना आहे.
मतदारसंघात ज्यांना एबी फॉर्म वाटण्याचे आदेश मिळतील तेव्हा मदारसंघात धावाधाव होण्याची अधिक शक्यता आहे. अनेक विद्यमान आमदारांना स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विरोध देखील कारणीभूत ठरू शकतो. दरम्यान कोअर कमिटीने काही अकार्यक्षम आमदारांची नावे निश्चित केली आहे. त्यानुसार शिवसेनेकडून एकूण ८ ते १० आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. मात्र तिकीट कापले जाणारे आमदार कोण याची माहिती मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं