बारामती: भाजपचा ‘ढाण्या’ वाघ अजित पवारांसमोर फुसका बार ठरण्याची शक्यता

बारामती: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकालाचा पहिला कल महायुतीच्या बाजूने लागला आहे. जवळपास १४५ च्या वर महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी ९० जागांच्या वर आलेली आहे.
बारामतीमधून धनगर समजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देत भाजपाने अजित पवार यांच्याविरोधात कडवी झुंज देण्याचा केलेला प्रयत्न फसलेला दिसत आहे. अजित पवारांनी ५० हजार मतांची आघाडी घेतली असून गोपीचंद पडळकर यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. २०१४ मध्ये गोपीचंज पडळकर भाजपाच्या तिकीटावर सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. तर २०१९ लोकसभा निवडणूक वंचितकडून सांगलीमधून लढले होते. यावेळी पुन्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशावेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधून निवडणूक लढणार का ? अशी विचारणा करत अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर केली होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं