सीमेवर पुलवामासारखं काही घडलं नाही तर राज्यात सत्तांतर निश्चित होईल: शरद पवार

औरंगाबाद : पाकिस्तानातील सत्ताधारी आणि लष्करी अधिकारी स्वपक्षाकडे सत्ता राहावी म्हणून भारताविरुद्ध बोलत असतात, हे माझे वक्तव्य पाकिस्तानची स्तुती करणारे आहे काय, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करण्यापूर्वी अधिक माहिती घेतली असती तर बरे झाले असते, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांना शुक्रवारी दिले.
५२ वर्षे संसदीय राजकारणात असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी माहिती न घेता बोलणे बरे नव्हे. मी संरक्षणमंत्री होतो, पाकिस्तान आणि चीन काय आहेत, हे मला माहिती आहे. मलाही बोलता येईल. पण पंतप्रधानपदाची मला अप्रतिष्ठा करायची नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.
सीमेवर पुलवामासारखी घटना घडली नाही, तर राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. मराठवाड्यात केवळ निरोपावर आयोजित केलेल्या दौºयाला युवकांमधून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी सोलापूर येथून सुरू केलेल्या महाराष्ट्रव्यापी दौºयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. औरंगाबाद येथे मेळावा झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या आधी सीमेवर पुलवामा घडले. त्याचा लाभ राज्यकर्त्यांना झाला. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करीत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असल्याचा संदेश जनतेत पोहोचवला.
नाशिकच्या सभेत पंतप्रधान @narendramodi यांनी माझ्यावर टीका केली. पाकिस्तानची मी स्तुती केल्याचे ते बोलले. वास्तवात, पाकिस्तानमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे असे सत्ताधारी व सैन्य ज्यांच्या हातात ते सैन्याधिकारी सतत भारताविरोधात बोलतात, वातावरण तयार करतात,असे मी म्हणालो.#औरंगाबाद pic.twitter.com/kZnWJfLmK0
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 20, 2019
मी देशाच्या संरक्षण विभागाचा कारभार बघिलेला आहे, त्यामुळे काही सेवानिवृत्त लष्करी अधिकारी ओळखीचे आहेत. या लष्करी अधिकाऱ्यांना ‘पुलवामा’ घडला की घडवला याबद्दल शंका आहे; पण मी हा देशाचा विषय आहे म्हणून त्यावर बोलू नका, असे स्पष्टपणे सांगितले. पुलवामा घडण्यापूर्वी सत्ताधारी जाणार अशीच स्थिती होती. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पुलवामासारखी घटना घडली नाही, तर सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आपल्या हातात सत्ता कायम राहावी, अधिकार कायम राहावेत याची ते काळजी घेतात. पाकिस्तानचे सत्ताधारी, पंतप्रधान, राष्ट्रपती, सैन्याधिकारी हे सगळेजण पाकिस्तानच्या जनतेला धोका देतात, हे मी बोललो. आणि मोदी इथं सांगतात मी पाकिस्तानची स्तुती केली. ही काय पाकिस्तानची स्तुती आहे? #औरंगाबाद
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 20, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं