निवडणुका १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान; तर १० सप्टेंबर दरम्यान आचारसंहिता?

नाशिक : कोणत्या निवडणूका आणि आचारसंहिता केव्हा लागेल याचा अंदाज निवडणूक आयोगापेक्षा भारतीय जनता पक्षाचे नेतेच अधिक वर्तवितात आणि ते अचूक ठरतात हे नित्याचे झाले आहे. यापूर्वी देखील मुख्य निवडणूक आयोगाच्या आधी भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी निवडणुकीच्या तारखांचे भाकीत वर्तविले होते आणि त्या अचूक ठरल्या होत्या. त्यानंतर विरोधकांनी संशय व्यक्त करतं निवडणूक आयोगाकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान तसाच काहीसा प्रकार सध्या महाराष्ट्रातील नेते मंडळी देखील राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करत आहेत. सध्या त्यात भारतीय जनता पक्षाचे मंत्री देखील अग्रणी असून पक्षाचे संकटमोचक पक्षाला संकटात टाकू शकतात अशी वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुक नेमकी कधी होणार ? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली असताना आता त्याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाकीत केले आहे. राज्याची विधानसभा निवडणुक १० ते १५ ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता असुन, १० सप्टेंबर दरम्यान आचारसंहिता लागू होणार असल्याचा अंदाज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी महाजन यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेप्रमाणे मी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला आहे. मी काही ज्योतिषी नाही किंवा मला निवडणुकीच्या तारखा माहिती आहे असेही नाही. मागील निवडणुकांचा अंदाज विचारात घेऊन मी या तारखा सांगत असल्याचे स्पष्ट केले.
याबैठकीस सर्व लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या अगोदर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील पिंपरी येथील एका कार्यक्रमात सप्टेंबरपासून आचारसंहिता लागेल व ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील असे म्हटले होते. निवडणुक आयोगाने जरी आतापर्यंत विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त सांगितलेला नसला तरी, भारतीय जनता पक्षाच्या दोन मंत्र्यांनी याबाबत भाकीत केल्याने आता खरच विधानसभा निडवणुका ऑक्टोबरमध्ये होणार की काय ? या चर्चेला उधान आले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं