स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर गोळीबार, गाडी पेटवली

अमरावती: राज्यात मतदानाला सुरुवात झाली असतानाच, अमरावतीतील मोर्शी विधानसभा मतदारसंघात जाळपोळ आणि मारहाणीची घटना घडली आहे. महाआघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र भुयार यांना अज्ञातांनी मारहाण केली. तसंच त्यांची कारही पेटवून दिली. या घटनेमुळं परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘देवेंद्र भुयार यांना सकाळी साडेपाच वाजता गाडीतून खेचून मारहाण केली. त्यावेळी शहरातील काही लोक मॉर्निंग वॉकला आले होते. त्यावेळी आलेल्या लोकांनी गोळीबाराचा आवाज आल्यानंतर वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोरांनी पेट्रोल ओतून गाडी पेटवली.’
संवेदनशील मतदारसंघ असताना पोलीस इतके बेफीकीर का राहिले? महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. या घटनेवर प्रतिक्रिया देणारा सदाभाऊ खोत यांचाही व्हिडीओ आला आहे. त्यात त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे लोक स्टंटबाजी करणारे लोक आहेत. असं म्हंटलंय. मोर्शीतून कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार यांच्यात थेट लढत आहे. भुयार हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असले, तरी त्यांना उभय पक्षांकडून किती मदत मिळते, यावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं