मराठा आरक्षण रस्त्यावर उतरून नव्हे तर राष्ट्रपतींच्या सहमतीनेच मिळणार - छत्रपती संभाजी

नगर, ०३ जुलै | मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्राची पुर्नविचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता दोनच मार्ग शिल्लक आहेत. ते केंद्र सरकार आणि न्यायालयाशी निगडित असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी दोनच मार्ग आपल्यासमोर – जामखेडमध्ये संवाद यात्रा:
भाजपचे आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची पुर्नविचार याचिका फेटाळली असली तरी राज्य सरकारचे अधिकार अबाधित असल्याविषयी केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी हे मत मांडले. आशिष शेलार वकील असतील मात्र मला 102 व्या घटना दुरुस्ती वरून न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत जेवढे समजते, त्यावरून मराठा आरक्षण हा विषय आता रस्त्यावरील नसून न्यायालयातील आहे असे संभाजीराजे यांनी सांगितले. यासाठी दोनच मार्ग आपल्या समोर आहेत. राष्ट्रपतींच्या सहमतीने किंवा वटहुकूम काढूनच आपल्याला मराठा आरक्षण मिळवता येणार आहे असेही ते म्हणाले.
खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी संवाद यात्रा सुरू केली आहे. या निमित्ताने ते बहुजन समाजातील अठरा पगड समाजाशी ते संवाद साधत आहेत. शुक्रवारी पुणे ते दौंड मार्गे ते नगर जिल्ह्यातील जामखेड येथे आले. पुढे ते बीडला जाणार आहेत. जामखेडमध्ये आले असता विविध संघटना, विविध समाजातील नेते, कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपतींचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, वंचित आघाडीचे अरुण जाधव आदी नेते उपस्थित होते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Maratha reservation can be obtained only with the consent of the president by issuing an ordinance said Chhatrapati Sambhajiraje news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं