शिंदे गटातील मंत्र्यांकडून मराठा समाजाचा अपमान | २ वर्ष गप्प राहिलात, आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली?, असं वादग्रस्त वक्तव्य

Minister Tanaji Sawant | 2019 साली ज्यावेळेस तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आलात त्यावेळेस पुढच्या सहा महिन्यात आरक्षण गेलं. आम्हा मराठ्यांना काही कळत नाही का? तेव्हा काही आंदोलन वगैरे झालं नाही. सगळे शांत बसले. पण जसंच सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, अशा शब्दात तानाजी सावंतांनी वादग्रस्त विधान केलं. पुढं बोलताना ते म्हणाले, बघा डोकं कसं चालवलं जातं आज ओबीसींमधून आरक्षणाची मागणी केली, पुढच्या दोन महिन्याने एससी प्रवर्गातून मागणी करतील. याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे, असं सावंत म्हणाले.
सावंतांनी मराठ्यांना झापलं तर ब्राम्हणांचा जयजयकार :
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला. त्यांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली, असं सावंत म्हणाले. युती सरकार असताना आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चे निघाले. त्याला मुका मोर्चा म्हणून हिणवलं, मराठ्यांचा अपमान केला, आम्ही गप्प राहिलो. पण 2017-2018 मध्ये त्यात देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. ते टिकलं. दोन बॅच निघाले, त्यांना नोकऱ्या मिळाल्या, असं सावंत म्हणाले.
2024 च्या आतमध्ये आरक्षण :
माझ्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळायलाच पाहिजे. आम्ही सोडणार नाही घेतल्याशिवाय. ज्या समाजात मी जन्म घेतला त्या समाजासाठी सत्ता सोडायची वेळ आली तरी सोडेन, असं तानाजी सावंत म्हणाले. माझे नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे या 2024 च्या आतमध्ये आपल्याला पाहिजे तसं आरक्षण, टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं वचन तानाजी सावंतांनी दिलं.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Minister Tanaji Sawant controversial statement on Maratha Reservation check details 26 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं