आ.बच्चू कडूंच्या प्रयत्नाने अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना हक्काचं वाहन मिळालं

अमरावती: राज्यातील प्रशासकीय पातळीवरील लोकहिताच्या कामांची जवाबदारी जरी जिल्ह्यातील निरनिराळ्या सरकारी खात्यांवर असली तरी, आजची अनेक सरकारी खातीच सुविधां अभावी सामान्य लोकांची कामं वेळेवर मार्गी लावू शकत नाहीत. मात्र स्थानिक लोक प्रतिनिधी जर जागृत असतील तर त्यावर देखील मात करता येणं शक्य असल्याचं अमरावतीमध्ये पाहायला मिळालं आहे.
अनेकदा कर्तव्य बजावताना कामात ढिलेपणा आणणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना अद्दल किंवा सज्जड दम देताना अनेकांनी आमदार बच्चू कडू यांना पाहिलं असेल. मात्र तेच अधिकारी काही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं कळताच स्वतः आमदार बच्चू कडू यांनी पुढाकार घेऊन त्यावर तोडगा काढला आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.
महाराष्ट्रात आज कोठेही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना राज्य शासनाचे खात्यांतर्गत वाहन सुविधा दिलेली नाही. यामुळे अचलपूर तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सुसज्ज गाडी भेट देण्यात आली आहे. त्यामुळे आज राज्यात अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना पहिलं हक्काचे वाहन मिळालं आहे. स्वतः आमदार बच्चू कडू यांनी त्यासंदर्भात ट्विट केलं आहे.
राज्यात कोठेही जिल्हा क्रीडा अधिकारी यांना शासनाचे वाहन नाही यामुळे अचलपूर तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी यांना भेट दिली सुसज्ज गाडी.
यामुळे राज्यात पहिले अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी यांना मिळाले हक्काचे वाहन.. pic.twitter.com/v7aiOzUGGy— MLA BACCHU KADU (@RealBacchuKadu) December 5, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं