अनेकांच्या सभा झाल्या पण प्रचारात सामान्यांच्या प्रश्नांवर बोलले ते राज ठाकरे: सविस्तर

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला. प्रचारातील सर्वच विषयांना तोंड फुटल्याचं पाहायला मिळालं. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने पाहायला मिळाली आणि ती म्हणजे सत्ताधारी पक्ष भाजप आणि शिवसेना यांनी सामान्य लोकांच्या मूळ प्रश्नांना बगल दिल्याचं पाहायला मिळालं. केवळ जाहीरनाम्यात काही गोष्टी प्रसिद्ध करून प्रत्यक्ष प्रचार हा केवळ भावनिक मुद्यांवर केंद्रित ठेवला. एकूणच सत्ताधारी म्हणून बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, आर्थिक मंदी असे एक ना अनेक गंभीर असताना देखील भाजप आणि सेनेने त्यासंबंधित नैतिक जवाबदारी स्वीकारली नाही आणि पुढे त्यावर आपण काय करणार आहोत याची देखील वाच्यता केली नाही.
दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र शेवटपर्यंत सामान्य माणसाशी निगडित असणारे महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतकरी आत्महत्या, सैरवैर झालेला पीएमसी बँकेचा ग्राहक, आरेतील वृक्षतोड असे अनेक विषय प्रचारात उचलून दिले. तसेच शहर नियोजन आणि पायाभूत सुविधांबाबतची भूमिका देखील ठामपणे मांडल्याचे पाहायला मिळाले.
साधारणपणे भावनिक विषयांवरून आपल्या देशातील निवडणुका लढवल्या जातात हे नित्त्याचे झाले आहे. मात्र २०१४ मध्ये देशात काहीतरी मोठं विकासाभिमुख घडेल या अपेक्षेने मतदाराने भाजपाला भरभरून मतदान केलं आणि मोठ्या अपेक्षादेखील ठेवल्या. त्यासोबत मतदाराने भारतीय लष्कर आणि इतर धार्मिक विषयांवरून देखील सरकारचं समर्थन केलं. मात्र प्रत्यक्ष आर्थिक स्थिती इतकी बिकट झाली की बेरोजगारी नवनवे विक्रम रचत आहे आणि महागाई देखील ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे आणि डॉलरने आजवरचा उच्चस्तर गाठला आहे आणि त्यामुळे निर्यातदार देखील प्रचंड नुकसान सोसत आहेत.
बँकिंग व्यवस्थेतील गोंधळलेलं धोरण आज ग्राहकाच्याच मुळावर आल्याने लोकांचा सत्ताधाऱ्यांवरील विश्वास संपुष्टात येतो आहे. तसेच मतदाराने २०१४ नंतर अनेकवेळा लष्कराच्या विषयांवरून सरकारला फायदा करून दिला, मात्र देशातील प्रत्येक निवडणुकीत भारतीय लष्करासंबंधित विषय सारखे समोर येऊ लागल्याने विरोधकांना चुकीचं समजणाऱ्या अनेकांचे डोळे हळूहळू उघडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून काश्मीर आणि इतर धार्मिक विषयांवरील प्रचारामुळे लोकांची सरकारप्रती असलेली भावना संपुष्टात येताना दिसत आहे. अगदी मोदींच्या अनेक सभांमध्ये मोकळ्या खुर्चाचें खच पाहायला मिळाले. तसेच विरोधक बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, आर्थिक मंदी अशा अनेक गंभीर विषयांवरून कोणतीही जवाबदारी स्वीकारताना दिसले नाही आणि केवळ भावनिक मुद्दे पुढे रेटून सभा रंगवण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या बाजूला सामान्यांचे विषय उचलून धरलेल्या राज ठाकरे यांना प्रसार माध्यमांनी देखील राज ठाकरे यांच्या सभा उचलून धरल्या आणि त्याचा फायदा मनसेला नक्कीच होईल असं चित्र सध्या आहे.
दुसरीकडे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी राज्यात एकूण ९ सभा घेतल्या, तर अमित शहा यांनी २१ सभा आणि १ ठिकाणी रोड शो केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ४८ सभा, ३ रोड शो व १ माँर्निंग वॉक केला. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ४८ सभा विविध मतदारसंघात घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र यात भावनिक विषयांना महत्व देण्यात आलं आणि सामान्यांशी संबंधित विषय बाजूला सारण्यात आल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे भाजप-शिवसेनेला याचा नक्कीच फटका बसण्याची शक्यता अनेक राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं