२२ ऑगस्टला ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीकडून आलेल्या नोटीशीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर 22 ऑगस्ट रोजी मनसेचे कार्यकर्ते ईडी कार्यालकडे जाणार आहेत. राज ठाकरेंच्या समर्थनार्थ त्यांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रासह देशातील सर्वच कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमा होतील. मात्र, सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, याची काळजीही आम्ही घेणार आहोत. त्यासाठी, शांततेच्या मार्गानं आम्ही ईडी कार्यालायबाहेर जाऊ, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसेकडून २२ तारखेला ठाणे बंदची हाक देण्यात आली. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मनसेकडून करण्यात आल्याचं काल काही प्रसारमाध्यमांनी म्हटलं होतं. मात्र आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. २२ ऑगस्ट ला आम्ही शांतपणे राज ठाकरेंसोबत जाणार आहोत असं नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याने स्थानिक पोलीस प्रशासनाची आणि ईडीची डोकेदुखी वाढणार असल्याचं समजतं. त्यामुळे २२ तारखेला कोणत्याही राजकीय दबावाची मनसे कार्यकर्त्यांना चुणूक लागल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची भीती असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाऊ शकतो. मात्र स्वतः राज ठाकरे यांनी २२ ऑगस्टला ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका असं आवाहन केलं आहे. तसेच मी योग्य वेळी बोलेन असं सुद्धा म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं