विधानसभा निवडणूक २०१९ : राज ठाकरेंच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. राज ठाकरे या दौऱ्याची सुरुवात पुण्यापासून केली असून आज ते गटअध्यक्ष आणि शाखाध्यक्षांच्या बैठका घेतील. राज्यातील विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील प्रयत्नशील आहे. यासाठी स्वत: राज ठाकरे मैदानात उतरले असून पक्षातील मरगळ झटकण्यासाठी ते कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार आहेत. पुण्यापाठोपाठ राज ठाकरे नाशिकचा देखील दौरा करणार असल्याचे वृत्त आहे.
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे आगामी काळात ते आघाडीसोबत जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात काही वेगळी समीकरणं पाहायला मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथं ही भेट झाली. त्यामुळे राज ठाकरे आघाडीत जाण्याच्या विचारात आहेत की काय, याची चर्चा सुरू झाली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं