भांडूप, शिवडी, पनवेलमध्येही राज ठाकरेंच्या सभा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्रातील विविध भागातील सभांचा झंजावात सुरू झाला आहे. आतापर्यंत नांदेड, सोलापूर, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी सभा झाल्या असून आज पुण्यात तर उद्या रायगड येथे सभा होणार आहे. ‘मोदी मुक्त देश’ असा आक्रमक पवित्रा घेतलेले राज त्यांच्या प्रत्येक सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भारतीय जनता पक्षाची पोलखोल करत आहे. महाराष्ट्रातील हा सभांचा झंजावात संपाल्यावर राज त्यांच्या सभांचा मोर्चा भांडूप, शिवडी, पनवेलमध्ये वळवणार असल्याची शक्यता आहे.
यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे. मात्र देशावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीचे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करणारच, असा आक्रमक पवित्रा राज यांनी घेतला आहे. तसेच राष्ट्रवादी-काँग्रेसला पाठिंबा देत त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज सभा घेत आहेत.
अशोक चव्हाण, उदयनराजे, सुप्रिया सुळे, राजू शेट्टी, सुशीलकुमार शिंदे, सुनील तटकरे या उमेदवारांसाठी राज मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रातील सभा झाल्यानंतर या महिन्यात २३ भांडूप, २४ भिवंडी, २५ पनवेल तर २६ तारखेला नाशिकमध्ये सभेचे नियोजन आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं