निवडणुकांच्या तोंडावर मनसेत भूकंप होण्यास सुरुवात | राजन शिरोडकर यांचे पुत्र आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई, १६ जुलै | आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेला पुन्हा एकदा शिवसेनेने जबर धक्का दिला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं आहे. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. आदित्य शिरोडकर यांच्या अचानक पक्ष सोडण्याने मनसेला धक्का बसला आहे.
काही महिन्यांपूर्वीच मनसेनं संघटनात्मक मजबुतीला सुरूवात केली होती. प्रमुख महानगरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार करण्यात आलं. यात एक मनसे नेता आणि सरचिटणीस असा समावेश करण्यात आला होता. यात मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी आदित्य शिरोडकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. तर मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये आदित्य शिरोडकर यांच्यावर उच्च शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर जी यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/cyARqAYXRY
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) July 16, 2021
मनसेतील नेते पदावरील मंडळी जवाबदारी घेण्यापेक्षा इतरांना दोष देण्यात मग्न…परिणामी:
मागील वर्षी २३ जानेवारीला मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण आणि पक्षाचं पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडलं होतं. त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी मनसेने मुंबईतील राजगड कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये बाळा नांदगावकर यांनी एका दिलेल्या मुलाखतीत पक्षाचे नेते, महिला, विद्यार्थी आणि कामगार संघटना पक्षाच्या वाढीसाठी कमी पडलो असल्याचं वक्तव्य केलं होतं. बाळा नांदगावकरांच्या या विधानावरुनच आदित्य शिरोडकर आणि बाळा नांदगावकर यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. मुंबईतल्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांसमोर हा प्रकार घडल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता.
मनसे विद्यार्थी सेनेचं अस्तित्व केवळ कागदावर:
कोणत्याही पक्षात विद्यार्थी सेनेचं महत्व मोठं असतं. कारण त्यामार्फतच पक्षातील युवा पिढी पुढे येत असते. मात्र मनसेत अमित ठाकरे यांच्याशी थेट संबंध असताना मनसे विद्यार्थी सेनेच्या वाढीकडे किंवा विस्ताराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि परिणामी राजकीय भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून मनसेतील युवा पदाधिकारी बाहेर पडत आहेत. यापूवी देखील मनसे विद्यार्थी सेनेतील पदाधिकारी सेनेत गेले आहेत. मात्र आता थेट मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष शिवसेनेत गेल्याने भविष्यकाळ कठीण असल्याचं दिसतंय. मनसेमध्ये हा धक्का युवा नेते अमित ठाकरे यांनाच अधिक असल्याचं म्हटलं जातंय.
राज ठाकरेंचे राईट हॅन्ड आणि बिझनेस पार्टनर राजन शिरोडकर यांचे पुत्र:
शिवसेनेत गेलेले आदित्य शिरोडकर हे राज ठाकरेंचे राईट हॅन्ड आणि बिझनेस पार्टनर राजन शिरोडकर यांचे पुत्र असूनही त्यांना हे थांबवता आलेलं नाही. तसेच हे राजन शिरोडकर यांना माहिती नसणार किंवा त्यांचा आशीर्वाद नसणार असं होऊ शकत नाही. त्यामुळे मनसेत राज ठाकरेंच्या जवळील नेत्यांमध्ये देखील सर्वकाही सुरळीत आहे असं म्हणता येणार नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: MNS leader Aditya Shirodkar join Shivsena party in presence of CM Uddhav Thackeray news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं