आगामी नाशिक आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी

नाशिक, २८ जुलै | महानगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच कंबर कसलेली आहे हे दिसून येतंय. मनसे नेते अमित राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुण्यात आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे.
आज दुपारी नाशिक शहरात अमित ठाकरे यांचं आगमन होईल. त्यानंतर ते पक्षाती नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. त्यांच्याशी वन टू वन चर्चा करतील. शहरातील एकंदर राजकीय परिस्थिती तसेच विविध वार्डांची स्थिती, असा एकंदर आढावा घेऊन त्याचा अहवाल ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. नाशिक आणि पुणे पाठोपात मनसे आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे.या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मुख्य अजेंडा ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीत मोठे फेरबदल होण्याचे संकेतही दिले जात आहेत. दरम्यान, ठाण्यात मनसेचा सध्या एकही नगरसेवक नाही. अशावेळी ठाणे महापालिकेसाठी होणारी मनसेची ही बैठक महत्वाची ठरणार आहे.
राज ठाकरे आता पुणे दौऱ्यावर:
राज्यात आता निवडूकीचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे सगळेच पक्ष आपल्या पक्षाला उभारी आणि बळकट करण्याचं काम करत आहेत. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सध्या राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. मात्र, आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १९ ते २१ जुलै असे तीन दिवस पुणे दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात आजीमाजी पदाधिकाऱ्यांशी राज संवाद उपक्रमा अंतर्गत राज ठाकरे हे संवाद साधणार आहेत. अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: MNS leader Amit Thackeray on Nashik Tour before Municipal Corporation Election news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं