ग्रामपंचायतीतही 'शिल्लक' न राहिलेल्या मनसेचे पदाधिकारी अजूनही पक्षकार्यापेक्षा शिवसेनेला टोमणे मारण्यात व्यस्त?

MNS Gajanan Kale | शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची संमतीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याशी अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनी चर्चा केली. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की परंपरेप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची प्रथा ही ठाकरेंचीच आहे.
त्यामुळे शिवसेनेचा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावरच झाला पाहिजे. आपल्याला संमती मिळो किंवा न मिळो शिवसैनिकांनी शिवाजी पार्क मैदानात जाव त्याचा त्याचा ताबा घ्यावा आणि मेळावा घ्यावा असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. ज्यामुळे त्यांनी एक प्रकारे शिंदे सरकारला ओपन चॅलेंजच दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे ग्रामपंचायत निकालात मनसे कुठे दिसतेय का अशी दिवसभर आस लावून बसलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना मनसे शिल्लक असल्याचं पाहायला मिळालं नाही. स्वतःचा पक्ष विस्तार सोडून शिवसेनवर ‘ट्विटर टोमणे’ मारून बातम्यांमध्ये राहणं हाच उद्योग राहिल्याचं पाहायला मिळतंय. मनसेचं ग्रामपंचायत निवडणुकीत नेमकं काय झालं यासाठी प्रवक्ते समोर आले नसले तरी, मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेवर निशाणा साधलाय.. मुंबई मनपा आणि राज्य सरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर”टोमणे मेळाव्यासाठी परवानगी द्यावी.. खंजीर, वाघनखं,गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये तसंही यावेळची स्क्रिप्ट बारामतीहून येणार आहे असा खोचक टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावलाय.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: MNS Leaders Gajanan Kale on Shivsena Dasara Melava check details 20 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं