कड्डक ट्विट! तुलसी जोशींच्या 'त्या' फाईल चोर व्हिडिओने महाराष्ट्र भाजप तोंडघशी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांच्या तडाख्याने राज्यातील भाजप पूर्ण विचलित झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रचा दौरा करत राज ठाकरे भाजपाला आणि मोदी-शहा या जोडीला व्हिडिओ पुराव्यानिशी कात्रीत पकडत आहेत. परंतु, राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या एकही प्रश्नाचं उत्तर न देता महाराष्ट्र भाजप ‘लाव रे तो व्हिडिओ’ या नावाने मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकीच्या कृत्याचे व्हिडिओ ट्विट करून त्यात राज ठाकरेंना मेन्शन करून टोला लगावत आहेत. वास्तविक ज्यांचा साडी चोरतानाचा व्हिडिओ महाराष्ट्र भाजपने ट्विट केला आहे, त्या महिला कार्यकर्त्यांची त्याच दिवशी अधिकृतरित्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या सचिव सौ.मीना पाटील यांची हकालपट्टी करण्यात येत आहे.
भविष्यात यापुढे सौ.मीना पाटील या मनसेच्या कोणत्याही पदाचा वापर करू शकणार नाहीत त्याचप्रमाणे त्यांचा महिला सेना व मनसे पक्षाशी कोणताही संबंध असणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.— Shalini Thackeray (@ThakareShalini) November 2, 2018
दरम्यान, मनसे महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या साडी चोरी, संबंधित दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर संबंधित महिला पदाधिकाऱ्याची अधिकृतपणे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. स्वतः शालिनी ठाकरे यांनी ट्विट करून तशी माहिती दिली होती. त्याच व्हिडिओला महाराष्ट्र भाजपने ट्विट करून थेट राज ठाकरे यांना मेंशन केलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या मोदी-शहांवरील आरोपांच्या मूळ व्हिडिओवर पुराव्यानिशी उत्तर देण्याची धमक भाजपकडे नसल्याने ‘ए लाव रे तो व्हिडिओ’या टॅगलाईनने कार्यकर्त्यांच्या चुकीच्या कृत्यांच्या व्हिडिओ ट्विट करत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र भाजपाला मनसेचे पालघरमधील महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांनी एक व्हिडिओ ट्विट करून चांगलंच तोंडघशी पाडलं आहे. त्यात त्यांनी केंद्रातील राफेल फाईलमधील झालेल्या कागदपत्रांच्या चोरीचा अप्रत्यक्ष संदर्भ देत, तशा प्रकाराच्या फाईल चोरीच्या कृत्यात भाजपचे राज्यातील चौकीदार देखील सामील असल्याचा व्हिडिओ तुलसी जोशी यांनी ट्विट करत भाजपाला ‘मूळ विषयावर बोला’ असा थेट इशारा दिला आहे…अन्यथा पुढे अजून व्हिडिओ शेअर केले जातील असा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.
VIDEO: काय आहे तो नेमका व्हिडिओ?
राज साहेबांच्या मूळ प्रश्नांना उत्तरं द्या, नाही तर दिल्ली ते गल्ली’मधील तुमचे फाईल चोर उघडे पाडू#चौकीदार-ही-फाईल-चोर-है pic.twitter.com/Wsb6G0GhXb
— Tulsi Joshi Palghar (@Tulsipalghar) April 19, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं