मोदी ब्रँड निर्मितीचे 'तेच' कॉर्पोरेट मॉडेल आदित्य ठाकरेंवर राबवलं जातं आहे; अर्थात फलदायी ठरणार: सविस्तर

मुंबई : मोदी ब्रँड अर्थात होकारात्मक असो किंवा नकारात्मक पण आजच्या घडीला देशातील सर्वाधिक चर्चेला जाणारा विषय आहे. मात्र ते गुजरात पुरता मर्यादित असलेलं राजकीय ब्रँड अचानक २०१४ पूर्वी पंतप्रधान पदाच्या चर्चेत कसं आणि एकदम देशावर राज्य कसं करू लागलं याचा अभ्यास केल्यास, ती एक शिस्तबद्ध आखली गेलेले योजनाच होती आणि आजच्या घडीला त्याला ‘राजकारणाचं कॉर्पोरेट मॉडेल’ म्हटलं तरी चालेलं. मात्र तत्पूर्वी भाजपने किंवा आरएसएस सारख्या संघटनांनी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ नेमले आणि त्यांचे सल्ले स्वतः ऐकून ते प्रत्यक्ष अंमलात आणले असंच एकूण आहे. कारण आजच्या घडीला शिवसेना वगळता इतर कोणत्याही पक्षात तज्ज्ञांच्या मतांची किंमत शून्यच असावी असंच म्हणावं लागेल. कारण इतर पक्षात तज्ज्ञ नेमून, त्यांच्या सल्ल्याने योजना अमलात आणण्यापेक्षा तंज्ञानाच ज्ञान देण्याचे प्रकार सुरु असावेत, मात्र आज शिवसेना त्याला अपवाद ठरली आहे असंच म्हणावं लागेल.
कारण मोदी ब्रँड निर्मितीची जी भव्य दूरदर्शी योजना २०१४ पूर्वीच आखली गेली होती, तीच आज शिवसेना काळाची गरज ओळखून आणि तज्ञांमार्फत ती स्वीकारून ‘आदित्य ब्रॅण्ड’ निर्मितीच्या मागे नियोजनबद्ध चालताना दिसत आहे. सध्याच्या राजकारणाचा संबंध हा केवळ पारंपरिक मतदार आणि पारंपरिक राजकारणा इतका मर्यादित राहिलेला नाही. आजची पिढी राजकारणापासून कोसो दूर असून त्यांना राजकारणात फारसा रस देखील नाही, किंबहुना त्यात रस निर्माण व्हावा असं मागील राजकारण्यांनी देखील काही करून ठेवलेलं नाही. त्यामुळे राजकारणात एखाद्याच्या चेहऱ्याची तोंडओळख करून द्यायची असेल तर तुम्हाला प्रथम स्वतःला मेहनत घेऊन नव्या पिढीच्या समोर जावंच लागेल. म्हणजे अगदी नरेंद्र मोदींच्या बाबतीत बोलायचे झाल्यास २०१४ मध्ये पंतप्रधान बनण्यापूर्वी केवळ गुजरात मधील राजकीय चेहरा एवढीच त्यांची ओळख होती. मात्र जेव्हा देशपातळीवर तोच चेहरा मतदाराला ओळखीचा करून देण्याची वेळ आली तेव्हा मात्र भाजप आणि आरएसएस मधल्या चाणक्यांनी मार्केटिंग’साठी अभ्यासपूर्वक एक चेहरा निवडला, जो महाराष्ट्रात मर्यादित असला तरी त्यावेळी देशभर आणि विशेष करून देशातील हिंदी भाषिक पट्ट्यात ओळखीचा झालेला चेहरा म्हणजे राज ठाकरे यांना आमंत्रित करून मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील अशी पुडी देशभर सोडून, मोदींचा चेहरा देशभर ओळखीचा करून दिला.
त्यानंतर २०१४ पूर्वी आणि २०१४ नंतरच्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी ब्रॅण्डिंग एका नियोजन पद्धतीने पुढे घेऊन जाण्यास सुरुवात झाली. त्यामागे पी.के अर्थात प्रशांत किशोर यांच्या आय-पॅक कंपनीचा सिंहाचा वाटा होता. चाय पे चर्चा पासून ते अनेक घोष वाक्य निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. कारण या एकूणच योजनेत कॉर्पोरेट मॉडेल ऑफ ब्रॅण्डिंग तंत्रज्ञानाचा आधार घेत मोठया प्रमाणावर राबविण्यात आलं. कालांतराने प्रशांत किशोर भाजपपासून दुरावले तरी भाजपने इतर तज्ज्ञांचा आसरा घेतला आणि त्यांच्या देखील सल्ल्याला महत्व दिलं. त्यानंतर पारंपरिक मतदारावरून शाळेतील आणि कॉलेजमधील १२-१३ वर्षाच्या विद्यार्थ्यांकडे मोदींच्या ब्रॅण्डिंगचा मोर्चा वळवण्यात आला. कारण हाच आजचा विद्यार्थी ५ वर्षांनी नवं मतदार म्हणून उदयास येणार होता आणि सरकारचा दुसरा टर्म येताच वयाची १८ वर्ष पूर्ण करणार होता. त्याचाच प्रत्यय मोदींच्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारात आला होता. ज्यामध्ये प्रत्येक सभेत शेवटची १० मिनिटं किंचाळत किंचाळत ‘नवं मतदार’ म्हणजे मोदींच्या भाषणातील ‘मेरे फर्स्ट टाइम वोटर्स’ असा उल्लेख प्रत्येकाने ऐकला असले. तो त्याच पूर्वनियोजित ब्रॅण्डिंगचा भाग होता, ज्यासाठी मोदींनी मागील ४-५ वर्ष मेहनत घेऊन मोदी ब्रँड आणि स्वतःचा चेहरा त्यांच्या डोक्यात बिंबवला होता. भविष्यातील पिढीला किंवा मतदाराला स्वतःची ओळख करून देण्याची आणि परिचय करून घेण्याची आणि स्वतःच राजकीय ब्रँड त्यांच्या माथी मारण्याचं हे तंत्र आजच्या घडीला कोणी स्वीकारलं आणि अमलात आणलं असेल तर ते शिवसेनेनेच, ज्याचा त्यांना भविष्यात फायदा देखील होणार हे देखील निश्चित आहे. कारण पारंपरिक मतदार असताना देखील आजचं कॉर्पोरेट राजकारण स्वीकारून शिवसेनेने भविष्यातील राजकारणाची पद्धत आदित्य ठाकरे यांच्यामार्फत अमलात आणल्यास सुरुवात केली आहे.
प्रशांत किशोर यांच्या मातोश्री भेटीनंतर या नियोजनबद्ध घटनांना वेग आल्याचे पाहायला मिळाले. मुळात उद्धव ठाकरे यांना राजकारण कळत नाही असा विषय नव्हता तर भविष्यतील कॉर्पोरेट राजकारणाची पद्धत वेळीच ओळखून आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याला महत्व देऊन योजना प्रत्यक्ष अमलात आणण्यास सुरुवात केली. स्वतः पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी राहिलेले आदित्य ठाकरे यांनी देखील त्याच गांभीर्य ओळखून स्वतःला त्यात झोकून दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि मेहनत घेताना दिसत आहेत. त्याचा पहिला प्रयोग म्हणजे देशपातळीवर पक्ष पोहचवण्यासाठी आणि राजकारणातील उत्तर प्रदेशचे महत्व लक्षात घेऊन ‘चलो अयोध्या’ नारा देऊन हिंदुत्वाच्या नावाने राजकारण तापवण्यास सुरुवात केली. वास्तविक अयोध्यावारी पेक्षा उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या जास्तीत जास्त शाखा उघडण्याचा तो कार्यक्रम होता, ज्याला शिवसेनेने ‘चालो अयोध्या’ असा नारा देत राजकीय चातुर्य दाखवलं जे कोणाच्या ध्यानातच आलं नसावं. त्यामुळे ‘साप भी मरा और लाठी भी नही तुटी’ हा फॉर्मुला उत्तर प्रदेशात राबवून भाजपाला थंड केलं, हिंदुत्वाचे आम्हीच कैवारी आणि त्यासोबत महाराष्ट्रातील उत्तर भारतीय व्होटबँक मजबूत केली आणि आदित्य ठाकरे यांना या दौऱ्यात कॅमेऱ्यासमोर ठेवून अप्रत्यक्षरीत्या देशवासियांशी ओळख देखील करून दिली.
त्यानंतर शिवसेनेचे आमदार-खासदार असलेल्या मतदारसंघातील शाळा, कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्स मध्ये आदित्य ठाकरेंचे संवाद कार्यक्रम मोठयाप्रमाणावर आयोजित करण्यात आले, त्यामागील मूळ उद्देश आदित्य ठाकरेंचा चेहरा त्यांना परिचयाचा करून देणं हाच होता आणि त्यासाठी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंगसारखे गोड विषय त्याला जोडण्यात आले. त्यानंतर आदित्य संवाद आणि सध्या सुरु असलेला ‘जण आशीर्वाद’ दौरा देखील त्याच ‘मोदी कॉर्पोरेट ब्रॅण्डिंग’ प्रमाणेच असून, ज्यामध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञानांचा वापर करून लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत आदित्य ठाकरे हे ब्रँड शिस्तबद्ध पोहोचवलं जात आहे आणि त्यासाठी आदित्य ठाकरे देखील मेहनत घेत आहेत हे देखील वास्तव आहे. परंतु त्यामुळे त्यांचे संवाद कौशल्य देखील वाढताना दिसत आहे. यातून आदित्य ठाकरे राजकारणात टिकण्यासाठी आणि पसरण्यासाठी जे जे महत्वाचं आहे ते करताना दिसत आहे. मोदींप्रमाणे आज अनेक ठिकाणी आदित्य ठाकरेंवर टीका आणि कौतुक होत असलं तरी राजकारणात टिकण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे, ती प्रत्येक गोष्ट ते आज करताना दिसत आहेत आणि तेच भविष्यात त्यांच्या यशाचं गमक असेल हे निश्चित.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं