राणेंचा भाजपप्रवेश हे युती 'न' होण्याचं निमित्त ठरणार?

मुंबई: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान, मागील राज्यसभा निवडणुकीच्या वेळी नारायण राणे जर भाजपमध्ये गेले तर युती अवघड असल्याचा सांगणारी शिवसेना नेमका कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये सुरु असलेल्या इनकमिंग नेत्यामधील सर्वात मोठे नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे होय. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. या प्रवेशाबाबत त्यांनी अखेर खुलासा केला आहे. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलनाला राणे यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाची तारीख जाहीर केली. येत्या 1 सप्टेंबरला मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
बेस्ट संयुक्त कृती समितीने अनेक मागण्यासाठी उपषोषण सुरु केले आहे. यावेळी कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती खालवल्याने त्यांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी नारायण राणे आले होते. त्यावेळी पत्रकारांनी तुम्ही १ स्पटेंबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दिवसभर सुरु आहे. सुरु असेलेली चर्चा खरी आहे का ? या वर उत्तर देताना नारायण राणे यांनी तुम्ही ऐकले ते खरे आसल्याचे सांगून रविवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत त्यांनी दिले. नारायण राणे यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव नितेश आणि निलेश राणे हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं