हा मोदी कोण लागून गेला; साताऱ्यात मोदी पेढेवाले आहेत: उदयनराजेंची क्लिप व्हायरल

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. ते आज दिल्लीला जाऊन लोकसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत. तर उद्यापासून पितृपक्ष सुरू होत असल्याने ते आजच भाजपात प्रवेश करणार असल्याचेही म्हटले जात आहे. पितृपक्षानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला जात नाही अशी चर्चा आहे.
उदयनराजे आज सायंकाळी ८ वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपला राजीनामा देणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी साताऱ्यात असणार आहे. या यात्रेत उदयनराजे व्यासपीठावर उपस्थित असतील. त्याचवेळी त्यांचे समर्थक नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व अन्य पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतील, अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले उद्या नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उदयनराजेंनी स्वतः ट्विटरवर ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना थांबवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील उदयनराजेंशी संपर्क करुन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र राजेंनी ‘मी जातोय. मला संपर्क करु नका’, असं सांगितल्याची माहिती मुंडे यांनी दिली आहे.
दरम्यान, नोटबंदीच्या वेळी त्यांनी पंतप्रधान पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवताना म्हटलं होतं, कोण कुठला मोदी, कोण मोठा लागून गेला आहे काय, साताऱ्यात इकडे मोदी पेढेवाले आहेत’, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवली होती. मात्र आज त्याच मोदींच्या उपस्थितीत आणि त्यांच्यासमोर नम्र होत उदयनराजे यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागत असल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. समाज माध्यमांवर देखील त्याची चर्चा रंगली असून, ती व्हिडिओ क्लिप देखील व्हायरल करण्यात आली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं