'राजेंचा' केवळ राजकीय वापर? | संभाजीराजेंना भेट मिळत नाहीत, तर उदयनराजेंना मंत्रिमंडळात स्थानच नाही

मुंबई, ०७ जुलै | केंद्रीय मंत्रिमंडळाची नावं अखेरीस जाहीर झाले आहेत. मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज (७ जुलै) संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे तोच म्हणजे नारायण राणे यांचा फोटो.
मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या एकूण ४३ मंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. विशेषतः या मंत्रिपदाच्या यादीमध्ये ४ मंत्री हे महाराष्ट्राचे आहेत. दरम्यान एकीकडे महाराष्ट्राचे ४ नेते केंद्रात गेलेले असताना, दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीची खासदारकी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या उदयनराजेंना मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात संधी न देता डावलण्यात आलं आहे.
उदयनराजेंना डावलललं:
खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने मोठ्या प्रयत्नाने भाजपमध्ये समाविष्ट करून साताऱ्यात आपली ताकत वाढवली. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थिती मध्ये उदयनराजे भाजपवासी झाले. लोकसभेची पोट निवडणूक पुन्हा लागल्या नंतर साताऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा घेण्यात आली. मात्र उदयनराजे यांनी घेतलेल्या पक्ष बदलाच्या निर्णयाला सातारच्या जनतेने नाकारल्याने उदायनराजेंचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. या पराभवानंतर देखील त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली.
कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त:
उदयनराजेंना पुढे भविष्यात केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं जाईल अशी आशा त्यांच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना होती आणि अशा चर्चा ही जोरदार रंगल्या होत्या. मात्र आता (७ जुलै) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत उदयनराजे भोसले यांना कुठंही स्थान देण्यात आले नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: MP Udayaraje Bonsale do not got opportunity in union cabinet reshuffle news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं