मुंबई आणि नाशिक पोटनिवडणुकीत सुद्धा शिवसेनेचा भाजपाला धोबीपछाड

मुंबई: राज्यातील सत्तेचं टॉनिक मिळताच शिवसेनेला उभारी आली असून त्याचे प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांत यशाचा आलेख उंचावणाऱ्या शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे शिवसेनेचं पालिकेतील बळंही वाढलं आहे.
मुंबई महापालिकेतील मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला धक्का दिला आहे. शिवसेना उमेदवार विठ्ठल लोकरे प्रभाग क्रमांक १४१ मधून विजयी झाले. लोकरेंनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिनेश पांचाळ यांचा पराभव केला.
मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात महाविकास आघाडीतील नवा मित्रपक्ष काँग्रेस आणि जुना मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष उभे ठाकले होते. मात्र शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना ४ हजार ४२७ मतं मिळाली, तर भारतीय जनता पक्षाच्या दिनेश पांचाळ यांना ३ हजार ०४२ मतं पडली. त्यामुळे १ हजार ३८५ मतांनी दिनेश पांचाळ पराभूत झाले. काँग्रेसच्या अल्ताफ काझी यांना अवघी तीनशे मतं पडली.
नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक २६ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले आहेत. इथं महाविकास आघाडी प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेनेनं जागा राखली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. जाधव यांच्याविरोधात सेनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेलेले उमेदवार दिलीप दातीर हे उभे होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप दातीर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर या प्रभागात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. खान्देशी मतं ठरली निर्णायक ठरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या पोटनिवडणुकीत निच्चांकी मतदान झालं होतं.
Web Title: Mumbai BMC Mankhurd and Nashik by poll won by shivsena against BJP.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं