पवारांना मराठा आरक्षण नको आहे का हे त्यांनी स्पष्ट कराव : नारायण राणे

मुंबई : पवारांनी नेमका आताच आरक्षणाबाबतचा मुद्दा का उपस्थित केला आणि दुसरं म्हणजे शरद पवारांना मराठा आरक्षण नको आहे का ते त्यांनी आधी स्पष्ट कराव असं नारायण राणे म्हणाले.
मराठा समाज आरक्षण हे शैक्षणिक आणि आर्थिक निकषांच्या आधारेच मागत आहे. सध्या असलेले आरक्षण हे त्या समाजाची आर्थिक परिस्थिती बघूनच देण्यात आले आहे असं ही राणेंनी स्पष्ट केलं. जर पवारांना मराठा आरक्षण नको असेल तर त्यांनी ते स्पष्ट सांगाव असा प्रतिप्रश्न ही नारायण राणेंनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत आणि त्या मुलाखती दरम्यान राज ठाकरेंच्या भात्यातून बाहेर पडलेल्या प्रश्नांचे अचूक बाण हे शरद पवारांच्या दिशेने गेले खरे, पण त्यानंतर पवारांकडून मिळालेली उत्तर अनेक सुध्दा रोज नवीन प्रश्न घेऊन पवारांकडे बोट करत आहेत.
आधी स्वतंत्र विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी लेखी निवेदनातून पवारांवर टीका केली आणि आता नारायण राणे यांनी ही पवारांना मराठा आरक्षण या विषयावर लक्ष केलं आहे. नारायण राणे टीका करताना असं ही म्हणाले की याआधी शरद पवारांनी कधीच आर्थिक निकषाचा उल्लेख केला नाही. मग आताच पवारांना अस का वाटतं आहे असा उलट प्रश्न राणेंनी राष्ट्रवादीचे काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांना केला आहे.
एकूणच पार पडलेल्या मुलाखतीवर बोलताना नारायण राणे म्हणाले की, मुलाखत ही ऐतिहासिकच होती कारण ती स्वच्छ कपड्यातील स्पष्ट मुलाखत होती असं ही नारायण राणेंनी प्रामाणिकपणे मान्य ही केलं. शरद पवार हे मोदींचे गुरु असल्याने त्यांना मोदींवर टीका करण्याचा अधिकार आहे असा उपरोधात्मक टोलाही त्यांनी लगावला. तसेच भाजप बद्दल बोलताना राणे म्हणाले की, भाजपला स्वतःची प्रतिष्ठा राखायची असेल तर त्यांनी अधिवेशनापूर्वी काय तो निर्णय घ्यावा.
मराठा आरक्षणाबाबत नारायण राणेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
मराठा समाजाला आरक्षण हे शैक्षणिक, आर्थिक निकषाच्या आधारावरच मागतोय. @PawarSpeaks यांना मराठा आरक्षण नको आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे. आरक्षणाबाबतचा प्रश्न त्यांनी आताच का उपस्थित केला? (१/२)
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 22, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं