विधानसभा:: राणेंना भाजपात तर भुजबळांना शिवसेनेत आणण्याची तयारी?

मुंबई : राज्याच्या सक्रीय राजकारणातून बाहेर फेकले गेलेले माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे नाराज असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कॉंग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असणारे राणे यांना शिवसेनेच्या विरोधामुळे स्वतंत्र पक्ष काढावा लागला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आग्रही असल्याने मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याचं बोलले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असल्याबाबत विचारणा करता, योग्य वेळी उत्तर देऊ, असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले. खासदार नारायण राणे नेमका कोणता निर्णय घेतात त्यावरून शिवसेना छगन भुजबळ यांच्याबाबतीत निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. विशेष म्हणजे आमच्या प्रतिनिधींना भाजपच्याच गोटातून मिळत असलेल्या माहितीनुसार भाजप प्रत्येक मोठ्या बैठकीत शिवसेनेसोबतच्या जागावाटपावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशा बातम्या प्रसार माध्यमांकडे जाणीवपूर्वक पेरून सेनेला गाफील ठेवत आहे आणि विधानसभा स्वबळावर लढण्याची रणनीती आखात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील पक्षाच्या ताकदीची चाचपणी सुरु असून जेथे भाजपाची ताकद नाही किंवा संघटन नाही तेथे इतर शक्तिशाली आणि संघटन असलेल्यांना पक्षात प्रवेश देऊन तयारी सुरु आहे.
दोन्ही पक्षाचे नेते युतीने लढण्याचा दावा करत आहेत, परंतु स्वतंत्र लढण्याची चाचपणी देखील केली जात आहे. यामध्ये नारायण राणे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश देत कोकणात शिवसेनेलाच शह देण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसत आहे. राणेंच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच प्रयत्न करत असल्याचं राणेंनी यांनीच एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं होतं. तसेच मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भातील राणे समिती आणि त्यांचं योगदान भाजपाला लाभदायी ठरू शकतं त्यामुळे भाजप सर्व योजना आखात असल्याचं म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं