राज्यात आज प्रचाराचा धडाका, मोदी मुंबईत तर राहुल गांधींची संगमनेरमध्ये सभा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता शनिवारी होणार आहे. त्याआधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ मुंबईत धडाडेल. तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शिर्डी मतदारसंघातील संगमनेरमध्ये सभा होणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील मोदींच्या मुंबईतील सभेत उपस्थित राहतात का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील उर्वरित १७ मतदारसंघांत सोमवारी, २९ एप्रिलला मतदान होत आहे. प्रचाराची मुदत शनिवार २७ एप्रिलला संपत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार डोंबिवली आणि ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे यांची ठाण्यात पत्रकार परिषद होणार आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे आधी भिवंडीत आणि नंतर मुंबईत कुर्ला येथे प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांच्या सभा होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं