शिरूर लोकसभा: राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे सुरुवातीपासून आघाडीवर

शिरूर : लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्रथामिक कलांमध्ये एनसीपीएचे अमोल कोल्हेंनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. अमोल कोल्हेंविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी पुण्यामध्ये एनसीपीने शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमबाहेर अमोल कोल्हेंचा भावी खासदार असा उल्लेख असणारे बॅनर झळकले आहेत.
जुन्नर तालुक्यामधील एनसीपीच्या युवा मंचचे अध्यक्ष अतुल बेनके यांनी हे बॅनर लावले आहेत. मतमोजणीला सुरुवात होऊन अर्धातास उलटण्याआधीच अमोल कोल्हेंचे अभिनंदन करणारे हे बॅनर झळकले आहेत.
दरम्यान असे असले तरी शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची चांगली पकड असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी देत एनसीपीने मोठी खेळी केली आहे. कारण अमोल कोल्हे यांचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला मिळणाच्या शक्यता आहे. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील लढत रोमांचक होण्याची शक्यता असल्याची चर्चाचा स्थानिकांमध्ये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं