शरद पवार उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर; दुष्काळाने होरपळलेल्या जनतेशी संवाद साधणार

परळी : एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्या बीड जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात ते संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, दुष्काळी जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच गुरांच्या छावण्यांना भेट आणि जळालेल्या फळबागांची पहाणी देखील करणार असल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित राहणार आहेत.
पवार यांचे सकाळी १०.३० वाजता आष्टी तालुक्यातील खडकत येथे आगमन होणार आहे, तेथे ते शेतकर्यांशी थेट संवाद साधणार आहेत, त्यांच्या नेमक्या अडचणी समजून घेणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील एका गुराच्या छावणीस ते भेट देणार आहेत. दुपारी ०१.१५ वाजता ते नवगण राजुरी, जि.बीड येथील गुरांच्या छावणीस भेट देऊन त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. दुपारी ०३.३० वाजता ते पिंपळवंडी, ता.पाटोदा येथील गुरांच्या छावणीस भेट देणार आहेत, तसेच काही जळालेल्या फळबागांची पहाणी ही करणार असून, त्यानंतर मोटारीने बारामतीकडे रवाना होणार आहेत.
या दौर्यात त्यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब आजबे, युवक नेते संदिप क्षीरसागर, सतिश शिंदे, महेंद्र गर्जे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्यात यावेळी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकर्यांचे अश्रू पुसण्यासाठी शेतकर्यांचे जाणते नेते स्वतः शेतकर्यांच्या बांधावर जाणार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं