५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल औरंगाबाद आणि नाशिकच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. दरम्यान शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेकडून पीकविमा निवारण केंद्राची उभारणी करण्यात आली. यावेळी आयोजित छोटेखानी सभेत शेतकऱ्यांना नडाल तर तुमची मुंबईतील कार्यालये बंद करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला होता.
यावर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आणि एनसीपीचे नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ट्वीट करत त्यांनी “गेल्या ५ वर्षांपासून पिकविमा कंपन्यांचे कार्यालये मुंबईत आहेत, तेव्हापासून शेतकऱ्यांची या कंपन्या फसवणूक, लूट करत आहेत. परंतु शिवसेनेला केवळ निवडणुकीच्या तोंडावरच कार्यालये बंद करण्याचे सुचते का? उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका”अस विधान केले आहे. दरम्यान, काल औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आज उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
नेमकं काय ट्विट केलं आहे धनंजय मुंडे यांनी?
गेल्या ५ वर्षांपासून पिकविमा कंपन्यांचे कार्यालये मुंबईत आहेत, तेव्हापासून शेतकऱ्यांची या कंपन्या फसवणूक, लूट करत आहेत. शिवसेनेला मात्र निवडणुकीच्या तोंडावरच कार्यालये बंद करण्याचे सुचते का? उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका.https://t.co/RgipKADQFm@uddhavthackeray
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 23, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं