पतीला वाचवण्यासाठी 'फटे इसलीये राष्ट्रवादी से हटे' | ही कोलांटीउडी संबंध महाराष्ट्राने पहिली - रुपाली चाकणकर

पुणे, ०५ ऑगस्ट | सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यामुळे त्यांचा आपसूक केंद्र सरकारबद्दलचा द्वेष सहाजिकपणे उफाळून येणारच होता. म्हणूनच आपले पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावे लागत आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. मागील २ वर्षात ठाकरे सरकारने ‘फटे लेकीन हटे नही’ चे धोरणे स्वीकारले असल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचं नेमकं धोरण काय आहे ते जनतेला माहिती झालं आहे. औरंगाबादचं नाव संभाजी नगर करणारच येथून यांची सुरुवात झाली. करोनामध्ये जीव गमावलेल्या पत्रकारांना ५० लाख देणार, एमपीएससीच्या सर्व पदांची भरती ३१ जुलैपर्यंत करणार, टाळेबंदीच्या काळातील वीजबिलं माफ करणार,” अशी यादीच वाचून दाखवत चित्रा वाघ यांनी फटे लेकिन हटे नाही असा टोला लगावला.
सोनियासेना प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने त्यांचा केंद्रसरकारबद्दलचा द्वेष उफाळून येणारच होता
म्हणूनच आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावं लागतंय
मागील २ वर्षात ठाकरेसरकारने
‘फटे लेकीन हटे नही’चे धोरण कसं राबवलं ते जनतेला माहीतीये pic.twitter.com/mxEjtz9Wwi— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 4, 2021
याच विषयाला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्र वाघ यांना जिरदार टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय की, “राहुलजींनी संजय राऊत यांच्या पाठीवर थाप काय मारली आख्खी भाजपा कामाला लागली. राहिली गोष्ट ताईंच्या ‘फटे लेकीन हटे नही’ ची तर पतीला वाचवण्यासाठी ‘फटे इसलीये राष्ट्रवादी से हटे’ ही कोलांटीउडी संबंध महाराष्ट्राने पहिली आहे.
राहुलजींनी संजय राऊत यांच्या पाठीवर थाप काय मारली आख्खी भाजपा कामाला लागली. राहिली गोष्ट ताईंच्या ‘फटे लेकीन हटे नही’ ची तर पतीला वाचवण्यासाठी ‘फटे इसलीये राष्ट्रवादी से हटे’ ही कोलांटीउडी संबंध महाराष्ट्राने पहिली आहे.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 4, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: NCP Leader Rupali Chakankar slams BJP leader Chitra Wagh after reaction on Rahul Gandhi and Sanjay Raut meet news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं