एक्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष संपला असेल तर दुष्काळाकडे वळा आता : धनंजय मुंडे

मुंबई : काल शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि सर्वच टीव्ही वृत्त वाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले असून त्यात पुन्हा भाजपचं सत्तेत येईल असं म्हटलं आहे. त्यांनतर भाजप आणि भाजप समर्थक निवडणूक जिंकल्यासारखा जल्लोष करण्यात मग्न आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते मंडळी देखील संतापली आहेत असंच म्हणावं लागेल.
लोकसभा निवडणुकीचा रविवारी एक्झिट पोल दाखवण्यात आला. एनडीएचे बाजूने हे पोल होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधा-यांना ट्विटरच्या माध्यमातून टोला लगावला. विजयाचा जल्लोष झाला असेल तर दुष्काळाकडे वळा. दुष्काळाच्या प्रश्नावर गांभीर्य दाखवण्याची मानसिकताही राज्य सरकारमध्ये नाही अशी टीका त्यांनी केली आहे.
दुष्काळाच्या प्रश्नावर मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. सरकार दुष्काळावर काय उपाययोजना करतंय हे तर स्पष्ट सांगतच नाही पण कोर्टात साधी हजेरीही लावत नाही. इतके गांभीर्य दाखवण्याची मानसिकताही सरकारमध्ये नाही. एग्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष झाला असेल तर दुष्काळाकडे वळा… https://t.co/WQnMJ3egJp
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 20, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं