काल शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आणि सरकारने या यात्रेचा धसका घेतला

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी मोर्चेबंधणीला सुरवात केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू केली आहे. या यात्रेत खा. कोल्हे आपल्या पक्षाला बळ देणार असून राज्यातील जनतेला विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या भूमिका समजावून सांगत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या बहुउद्देशीय या ‘शिवस्वराज्य यात्रेत’ गटबाजी असल्याचं समोर आलं होतं. तर पक्षातील काही नेत्यांना विश्वासात व विचारात न घेता या यात्रेचे आयोजन केले असल्याची कुजबुज पक्षात सुरु असल्याचं बोललं जात होत.
#शिवस्वराज्य यात्रेला कालपासून ट्रोल करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे इतर नेते कुठे आहेत अशी विचारणा केली जात आहे. मात्र त्यांना हेच सांगायचे आहे की @Jayant_R_Patil @ChhaganCBhujbal @Awhadspeaks हे पूरपरिस्थितीl जनतेची मदत करण्यात व्यस्त आहेत.
– खा. अमोल कोल्हे#गंगापूर pic.twitter.com/febkNxQnUT— NCP (@NCPspeaks) August 7, 2019
इतिहासाची पुनरावृत्ती होतात असे म्हणतात. ८४ साली शरद पवारांना आजच्या सारखेच लोक सोडून जात होते मात्र गेले त्यापेक्षा दुप्पट आमदार पवारसाहेबांनी निवडून आणले. पानगळ गळली की नव्याने पालवी फुटते तशीच पानगळ जावून नवी पालवी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून फुटली आहे असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गंगापूर येथील जाहीर सभेत मांडले.
. @CMOMaharashtra यांच्या #महाजनादेश यात्रेदरम्यान शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्याच्या नेतृत्त्वावर अविश्वास व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. अकोल्यात सहा शेतकऱ्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
– खा. अमोल कोल्हे#शिवस्वराज्य #गंगापूर pic.twitter.com/qmQi51uhC2— NCP (@NCPspeaks) August 7, 2019
यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, काल शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आणि सरकारने या यात्रेचा धसका घेतला. आपली यात्रा सुरू झाल्या झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली महाजनादेश यात्रा संपुष्टात आणली. गंगापूरचे स्थानिक आमदारांनी असे भाष्य केले की आश्वासन फक्त द्यायचे असते पूर्ण करायचे नसते. या वाक्याचा हिशोब येत्या विधानसभा निवडणुकीत करा. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे तेव्हा येत्या काळात बदल घडवून शिवस्वराज्य स्थापन करण्यास सिंहाचा वाटा द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं