राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण; राष्ट्रवादीचं फडणवीसांना प्रतिउत्तर

मुंबई : बालभारती पुस्तकातील संख्यावाचनाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि एनसीपी’माहे चांगलाच कलगीतुरा रंगल्याच पाहायला मिळत आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला उत्तर देताना एनसीपी’च्या नेत्यांना लक्ष केलं होतं. त्यानंतर पुन्हा एनसीपीने भारतीय जनता पक्षाला जोरदार प्रतिऊत्तर देत ‘राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण, नितीन टोल भर, विनोद जोक मार, असं म्हणत एनसीपीने भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादीने एक फोटो शेअर करत भारतीय जनता पक्षाला‘जोड्या लावा’चा स्वाध्याय दिला आहे. तसेच बालिश भारतीचा नवा धडा, पुढील स्वाध्याय धडाधडा सोडवा, असं कॅप्शन दिलं आहे. भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांच्या मागील कृत्यांचा संदर्भ यात जोडून राष्ट्र्वादीने भाजपाला टोले लगावले आहेत. मुख्यमंत्री देखील त्यामुळे तोंडघशी पडल्याचे म्हटले जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवत बालभारतीच्या संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीनुसार सभागृहात संख्यावाचनाचे धडे दिले होते. यालाच मुख्यमंत्र्यांनी छगन कमळ बघ, शरद गवत आण, असा शब्दात जशास तसं उत्तर दिलं होतं.
काय आहे ती नेमकी फेसबुक पोस्ट?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं