महाराष्ट्रात राष्ट्रवादीला दुसरा सहकारी शोधण्याची गरज; अन्यथा काँग्रेससोबत स्वतःही?

मुंबई : लोकसभेचे निकाल लागले आणि पुन्हा मोदी सरकार सत्तेत आले, मात्र काँग्रेस देशात जवळपास भुईसपाट झाली. अगदी देशाच्या संसदेत विरोधी पक्ष नेत्याचं पद देखील अशक्य झालं आहे. देशभरातील तब्बल ८ राज्य काँग्रेसमुक्त झाली आहेत. मात्र महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर इथे देखील राज्य काँग्रेसमुक्त होण्यापासून थोडक्यात वाचलं. परंतु ते देखील लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यावर काही दिवसांनी आयत्यावेळी शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर काँग्रेसमध्ये आले आणि चंद्रपूर लोकसभेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि त्यामुळे काँग्रेस ९ राज्यात भुईसपाट होण्यापासून थोडक्यात वाचली.
वास्तविक महाराष्ट्रात काँग्रेसकडे असा एकही चेहरा राहिलेला नाही ज्याला ऐकण्यासाठी मतदार जमा होईल. केवळ पारंपरिक मतदारांच्या जीवावर राज्यातील राजकारणावर टाकलेला पक्ष आज शेवटची घटका मोजत आहे. लोकसभेतील प्रचारात काँग्रेसच्या एकही नेत्याची प्रसार माध्यमांनी देखील दाखल घेतली नाही आणि राज्यात प्रचाराच्या धुराळ्यातून काँग्रेस झाकली गेली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यातील सभांचा अभ्यास केल्यास त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या सभा देखील स्वतःच्या झंझावातात झाकून टाकल्या होत्या.
विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांना व्हिडिओ पुरावांच्या आधारे त्यांनी तोंडघशी पडल्याचं पाहायला मिळालं. त्यातून भाजप पूर्ती गर्तेत अडकल्याची सर्वात मोठा पुरावा म्हणजे संपूर्ण राज्यातील भाजप नेते मंडळी राज ठाकरे यांना प्रतिऊत्तर देण्यात पूर्णवेळ व्यस्त झाल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदी विरोधी योग्य ती वातावरण निर्मिती केली होती. मात्र त्याचा राजकीय फायदा उचलण्यात भाजपचे राज्यातील नेते पूर्णपणे फेल झाल्याचे पाहायला मिळालं. थोडक्यात बोलायचे झाल्यास शिक्षकाने धडे देण्याचे काम उत्तम बजावले, पण विद्यार्थी ते परीक्षेत प्रत्यक्षात उतरविण्यास फेल झाले. कारण राज ठाकरे यांचे विद्यार्थी तर परीक्षेला बसलेच नव्हते. दिलेल्या धड्यातुन परीक्षा राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच द्यायची होती.
राष्ट्र्वादीने किमान स्वतःकडे पूर्वी असलेल्या जागांचा आकडा राखण्याचे तरी कौशल्य दाखवले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे शरद पवार आणि अजित पवार असे चेहरे तरी होते, ज्यांना लोकं ऐकण्यासाठी तरी जमतील आणि त्यामुळे प्रचार सभा सत्कारणी लागते. मात्र काँग्रेसकडे अशोक चव्हाण असो किंवा पृथ्वीराज चव्हाण हे असे चेहरे आहेत, ज्यांच्या सभांसाठी गर्दी जमवणे म्हणजे अग्निपरीक्षाच आहे. जर मतदार यांना ऐकण्यासाठीच येणार नाही मतं तरी कशी देतील. त्यामुळे पारंपरिक मतांवर अवलंबून असलेले या नेत्यांच्या स्वप्नांना प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम या पक्षांनी सुरुंग लावला. तर राहुल गांधी हा राज्यातील मतदाराचा आकर्षणाचा विषय नाही आणि यापुढे तर अजिबात नसेल. त्यामुळे विधानसभेत काँग्रेससाठी परिस्थिती खूपच कठीण आहे. मात्र काँग्रेससोबत जाऊन राष्ट्रवादी स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईला तोंड फोडेल असं अनेक राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे. नवे सवंगडी शोधून राष्ट्र्वादीने स्वतःचा वेगळा मार्ग निवडणे हाच एकमेव मार्ग सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वतःसोबत स्वाभिमानी शेतकरी पक्ष, मनसे, शेकाप, प्रहार संघटना, बहुजन विकास आघाडी, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि शक्य झाल्यास बहुजन वंचित आघाडीला सोबत घेऊन वेगळीच राजकीय गणितं मांडण्याची गरज आहे. अन्यथा काँग्रेससोबत कौन भविष्य भीषण आहे हे या लोकसभा निवडणुकीत अधीरेखित झालं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं