आदित्य बाळासाहेबांचा नातू, पण त्याच्या वागण्यात अजिबात अहंकार नाही: अजित पवार

मुंबई: राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर नागपुरात पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी अनेक नवखे आमदार विधिमंडळात आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरेही पहिल्यांदाच आमदार झाला आहे. आता त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘आदित्य हा बाळासाहेबांचा नातू आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. मात्र त्याच्या वागण्यात अजिबात अहंकार नाही. तो सगळ्यांशी मिळून मिसळून वागतो.’ असं अजित पवार म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे यांचे कौतुक करताना अजित पवार म्हणाले, की ठाकरे म्हणजे सभास्थानी मोठाले पोस्टर, बाळासाहेबांचा नातू असला तरी तो मिळून-मिसळून वागतो. मुख्यमंत्री ठाकरेंनी आमदारांना भोजनाचे निमंत्रण दिले त्यादिवशी सभागृह उशीरापर्यंत चालले. मी तरुण आमदारांना घेवून १२ वाजता रात्री पोहोचलो. गरमागरम जेवण आदित्यच्या देखरेखीत मिळाले.
धीरज बोलत असताना मला काल विलासराव देशमुख बोलत आहेत का असंच वाटलं, बोलण्याची स्टाईल हुबेहूब विलासराव यांच्यासारखीच वाटत होती, असं अजित पवार म्हणाले. आमचा रोहित पण चांगला आहे, अदिती तटकरे, विश्वजीत कदम यंग टीम चांगलं काम करत आहेत”, असं म्हणत अजित पवारांनी युवा आमदारांचं कौतुक केलं. शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरू आहे. आधार क्रमांक लिंक करून कर्जमाफी देता येईल का, याचीही चाचपणी सुरू असल्याचं पवारांनी सांगितलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं