सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणाऱ्या मनसेला सार्वजनिक जबाबदारी समजणार नाही - राष्ट्रवादी

मुंबई, २२ फेब्रुवारी: राज्यात १ मार्चपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. परंतु, कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, विधीमंडळातील अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुनावले आहे.
“सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी हे कधीच सार्वजनिक जबाबदारी समजू शकत नाही. सार्वजनिक जीवनामध्ये मालमत्तेची तोडफोड करणे हा एक भाग झाला. आणि लोकांच्या जीवनाची सुरक्षितता करणे, त्यासंदर्भात उपाययोजना करणे, खबरदारी करणे यासाठी लोकांमध्ये जावं लागतं. लोकांच्या हिताचं संरक्षण करावं लागतं, हे मनसेचे पदाधिकारी कधी समजू शकत नाहीत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर टीका केली की, हे अधिवेशन घ्यायचे नाही म्हणून लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत”.
कुठेतरी खोटी आकडेवारी दाखवली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन घ्यायचे नसल्याने लॉकडाऊनची भीती दाखवली जात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याचे वक्तव्य योग्य नाही. महाविकासआघाडी सरकार जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य करू नये”, अशी विनंती महेश तपासे यांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन घ्यायचे नसल्याने लॉकडाऊनची भीती दाखवली जात असल्याचे मनसे नेत्याचे वक्तव्य योग्य नाही. महाविकास आघाडी सरकार जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. मनसेने लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य करू नये – @maheshtapase@SandeepDadarMNS pic.twitter.com/9u0SA3Bc87
— NCP (@NCPspeaks) February 22, 2021
News English Summary: The convention will start from March 1 in the state. But, the number of corona patients has started to increase. Also, many leaders in the legislature have begun to become infected with the corona. Maharashtra Navnirman Sena general secretary Sandeep Deshpande has criticised this. The NCP has responded to his criticism. NCP spokesperson Mahesh Tapase tweeted a video to Maharashtra Navnirman Sena.
News English Title: NCP spokesperson Mahesh Tapase tweeted a video to answer Maharashtra Navnirman Sena news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं