२०२४ मध्ये राष्ट्रवादी राज्यात एक नंबरचा पक्ष होईल; भाजपात गेलेले आमच्या संपर्कात: जयंत पाटील

इस्लामपूर: भारतीय जनता पक्षात अनेक गेलेल्या अनेक नेत्यांनी फोन करुन आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा एनसीपी’चे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. २०२४ मध्ये एनसीपी राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल यासाठी प्रयत्न करु असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सांगलीमधील इस्लामपूर येथे जयंत पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षामध्ये गेलेल्या अनेक नेत्यांनी आम्हाला फोन करुन संपर्क केला आहे. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचं राजकारण सुरु केलं. राजकारणात बेरजेचं राजकारण फार महत्त्वाचं आहे, असं वक्तव्य एनसीपी’चे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केलं. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे बोलत होते. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच इस्लामपूरमध्ये आलेल्या जयंत पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच जंगी मिरवणुक देखील काढण्यात आली.
जयंत पाटील म्हणाले, “देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीनंतर इतकं मोठ राजकारण घडलं आहे. टीव्ही लावला की जनतेला सकाळी एक, दुपारी दुसरं आणि रात्री तिसरंच राजकारण बघायला मिळालं. पण जनतेचं मत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचं आणि काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना यांनी एकत्र येण्याचं होतं. त्यामुळे तशा राजकीय घडामोडी घडल्या.”
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवावं आणि काँग्रेस, एनसीपी, शिवसेनेने एकत्र यावं हेच जनतेच्या मनात होतं. त्यामुळेच तशा राजकीय घडामोडी घडल्या असं जयंत पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचाला सोबत घेतल्याशिवाय कोणीही सरकार स्थापन करु शकणार नव्हतं, आणि तसंच झालं.
एनसीपी’चा ५० आमदारांचा आकडा पूर्ण केल्यावर आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कोणीही सरकार स्थापन करु शकणार नव्हतं. त्याप्रमाणेच झालं. २०२४ मध्ये एनसीपी’ हा राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल, असा प्रयत्न करू, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. “कर्जमाफीच्या आधी राज्याच्या तिजोरीची स्थिती बघावी लागणार”, तसेच सत्ता आल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी कर्जमाफी बाबत विचारणा होते आहे. परंतु, या बाबत थोडा वेळ द्यावा लागेल. राज्याची तिजोरी स्थिती बघावी लागणार आहे, परंतु थोड्या दिवसात आम्ही योग्य निर्णय घेणारच आहे, अस ही यांनी सांगितलं.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं. सरळ माणूस आहे. स्पष्ट वक्ता, खरं बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जाईल. मुख्यमंत्री म्हणून बघण्याची सवय तुम्हाला काही दिवसांत होईल. थोडा वेळ या सरकारला द्यावा, सगळ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहेत अशी माहितीही जंयत पाटील यांनी दिली.
NCP will be biggest Party in Maharashtra State after 2024 Assembly Election says Minister Jayant Patil at Islampur Speech
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं