अखेर चित्रा वाघ यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; राष्ट्रवादीला रामराम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजीनामा सत्र थांबायचं नाव घेत नाही आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सचिन अहिर यांच्याप्रमाणेच चित्रा वाघ यादेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चांना शुक्रवारी उधाण आलं होतं. शेवटी चित्रा वाघ यांनी राजीनामा देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असून पक्षाच्या प्राथमिक सभासदत्वाचा देखील राजीनामा देत आहे. महाराष्ट्रातल्या महिलांची सेवा करण्यासाठी आणि त्यांचा आवाज बनण्यासाठी मला दिलेल्या सर्व संधींसाठी मी तुमची (शरद पवार) आभारी आहे’, असं चित्रा वाघ यांनी त्यांच्या राजीनाम्यात म्हटलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे देखील भाजपमध्ये येत्या ३० जुलैला प्रवेश करणार आहेत. शुक्रवारी त्यांनी अकोला येथे मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर वैभव पिचड भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, आता त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
आगामी विधानसभा निवडणूका दोन महिन्यांवर असताना राष्ट्रवादीला धक्के बसले आहेत. यावर राष्ट्रवादी कशी सावरते तसंच चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
My Resignation ???? @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks @ANI pic.twitter.com/IohS5J5iz6
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 26, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं