वरिष्ठांना वेटिंग लिस्टवर ठेवून 'आदित्य महाराष्ट्र तुझी वाट पाहत आहे' अभियान सुरु

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि भाजप सरकार बहुमताने सत्तेत विराजमान झाले. मोदी त्सुनामीत शिवसेनेची सुद्धा लॉटरी लागली, मात्र भाजप बहुमताने सत्तेत विराजमान झाल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पावर जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे केंद्रात भविष्यात देखील काहीच हाताला लागणार नाही याचा पक्ष नैतृत्वाला मनातून का होईना साक्षात्कार झाला असणार.
लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वबळाचा नारा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची I-PAC चे संस्थापक आणि राजकीय तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर भेट घेतली आणि काही दिवसातच भाजप-शिवसेनेत सर्वकाही आलबेल झाल्याचं पाहायला मिळत आहे. एका बाजूला केंद्रात मंत्रिमंडळ वाटपावरून जी अवस्था शिवसेनेची झाली आहे, नेमकी तीच अवस्था बिहारमध्ये जनता दलची (सेक्युलर) म्हणजे सध्या ज्या पक्षात स्वतः प्रशांत किशोर देखील आहेत त्या पक्षाची सुद्धा बिकट अवस्था झाली आहे. मात्र स्वतः राजकीय तज्ज्ञ प्रशांत किशोर आणि स्वतः पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी राहिलेल्या आदित्य ठाकरे यांचे सूत चांगलेच जुळल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वीच आणि प्रशांत किशोर यांच्या मातोश्री भेटीनंतर लगेचच आदित्य ठाकरे यांच्या नावाने ‘टॅग लाईन’ असलेले अनेक राजकीय कॅम्पेन सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच शिवसेनेतील प्रत्यक्ष जमिनीवर लढून आणि लोकांमधून निवडून येणाऱ्या आमदार आणि खासदारांना अंधारात ठवून, पक्षात शॉर्टकटने राज्यसभेवर खासदार बनून जाणाऱ्या नेत्यांच्या तोंडून ‘आदित्य महाराष्ट्र तुझी वाट पाहत आहे’ असे राजकीय कॅम्पेन सुरु झाले आहेत आणि त्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने आदित्य ठाकरे यांच्या पक्षातील हालचाली जोरदार सुरु असून, पक्षातील अनेक वर्ष त्याच पदाची अपेक्षा बाळगणारे नेते आता वेटिंगवर गेले आहेत आणि याची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.
त्याचाच एक भाग म्हणजे काल आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतः मंत्री एकनाथ शिंदे तब्बल २५ आमदारांच्या ताफ्याने आले आणि आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या, मात्र त्यात एक अप्रत्यक्ष संदेश देखील होता, जो भविष्यात उफाळून येऊ शकतो. मात्र पक्षात सुरुवातीपासून मैदानावर काहीच मेहनत केलेली नसताना, केवळ पुत्र प्रेमापोटी भारतीय विद्यार्थी सेना बरखास्त करून ‘युवासेना’ स्थापन करून त्याचे अध्यक्षपद आदित्य ठाकरे यांना देण्यात आले. त्यानंतर शिवसेनेत २०-२५ वर्ष पक्षासाठी झगडणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील नेते पद मिळालेले नसताना, आज आदित्य ठाकरे यांना थेट नेतेपद बहाल करून शिवसनेतील वरिष्ठ नेत्यांच्या रांगेत विराजमान करण्यात आले आहे आणि सध्या थेट मुख्यमंत्री पदासाठी ‘आदित्य महाराष्ट्र तुझी वाट पाहत आहे’ असे राजकीय कॅम्पेन सुरु झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वाने जी राजकीय चाल कधीकाळी राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्याविरुद्ध वापरली होती, ती आज शिवसेनेतील सर्वच वरिष्ठ नेत्यांविरुद्ध कधी अमलात आणली गेली याचा सुगावा त्यांना देखील लागलेला नाही, असंच म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं