वर्षभर तरी नरेंद्र-देवेंद्र सरकारला धोका नाही, भेंडवळ घटमांडणीचं भाकित

बुलढाणा : मित्र पक्षांसोबत अंतर जरी वाढत असेल तरी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार वर्षभर तरी स्थिर राहील असं भाकीत सुप्रसिद्ध भेंडवळ मांडणीतून वर्तवण्यात आलंय. एनडीएमधील घटक पक्ष सध्या भाजपवर नाराज असून एका मागे एक मित्र पक्ष भाजप पासून फारकत घेत आहेत.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपसरकार कार्यकाळ पूर्ण करत की नाही असा प्रश्न उभा होता. परंतु केंद्र आणि राज्य सरकारांना वर्षभर कुठलाही धोका संभवत नसल्याचं भाकित सुप्रसिद्ध भेंडवळ मांडणीतून वर्तवण्यात आलंय.
भेंडवळ मांडणीमध्ये एका पानावर सुपारी ठेवतात आणि ती सुपारी जर हलली तर ‘राजा’ म्हणजे सरकारची खुर्ची अस्थिर आहे असं मानलं जात. परंतु घटाजवळ ठेवलेली सुपारी जशीच्या तशी होती. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांना वर्षभर कुठलाही धोका संभवत नसल्याचं सामाईक पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी जाहीर केलं.
राज्यातील शिवसेना सत्तेत असली तरी ते भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत सुद्धा केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार वर्षभर स्थिर राहील असं भेंडवळचं भाकित आहे. परंतु ते किती खरं हे येणार काळच ठरवेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं