सलमान नाही, शहीद शुभम मुस्तापुरे आम्हाला तुम्ही महत्वाचे!

परभणी : संपूर्ण देश आणि प्रसार माध्यम आज सलमान खानच्या २० वर्ष जुन्या काळवीट प्रकरणात हरवला आहे. पण केवळ २० व्या वर्षी देशासाठी लढणारा शहीद शुभम मुस्तापुरे माध्यमांच्या ठळक बातम्यांमध्ये नसल्याचे बघून महाराष्ट्रानामाच्या संपूर्ण टीमला दुःख होत आहे. देशाच्या सीमेवर देश रक्षणासाठी लढता लढता शहीद झालेला परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे सुपुत्र आहेत. अवघ्या विसाव्या वर्षी हा महाराष्ट्राचा वीर देशाचं रक्षण करता करता भारत मातेच्या कुशीत सामावून गेला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात शोकाकुळ वातावरण आहे.
आज शहीद शुभम मुस्तापूरे यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्थानिक हजारो नागरीक उपस्थितत शुभम मुस्तापुरे अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. लष्काराचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.
म्हणूनच म्हणतो, शहीद शुभम मुस्तापुरे आम्हाला तुम्ही महत्वाचे…. सलमान खान नाही ! तुमच्यासारखे वीर सुपुत्र देशाच्या सीमेवर आहेत तो पर्यंत हा देश सुरक्षित आहे. अभिमान आहे आमच्या टीमला की तुझ्यासारखा वीर सुपुत्र या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला आला. परमेश्वराच्या कृपेने तुझ्या आत्म्याला शांती लाभो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं